Bazar Samiti Result : अमरसिंहांच्या विरोधात भाजप आमदार पवार- शिवसेनेचे बदामराव एकत्र, पण डिपॉझिट झाले जप्त!

Beed Bazar Samiti Result News : सुरुवातीलाच अमरसिंह पंडित यांच्या आघाडीची एक जागा बिनविरोध निघाली.
Bazar Samiti Result :
Bazar Samiti Result :Sarkarnama

Beed Bazar Samiti Result News : बीड जिल्ह्यातील शुक्रवारी झालेलया सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालात गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल अगदीच मोठ्या फरकाने लागला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit) यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विरोधात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित एकत्र आले. परंतु, त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे डिपॉझिटच गुल झाले. अमरसिंह पंडित यांच्या पॅनलेच्या उमेदवारांनी सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातून तब्बल सातशे मतांच्या फरकाने विजय मिळविला.

जिल्ह्यातील वडवणी, परळी, केज, गेवराई, अंबाजोगाई व बीड (Beed Politics) कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले. गेवराई बाजार समितीवर पुर्वीपासून माजी मंत्री शिवाजीराव पंडित व अलिकडे त्यांचे पुत्र राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. या निवडणुकीत देखील त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी मैदानात उतरली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सल्ल्याने भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याशी त्यांनी आघाडी करत पॅनल निवडणुकीत उतरविला. लक्ष्मण पवार दुसऱ्यांदा गेवराईचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.

Bazar Samiti Result :
Maval Bazar Samiti Result: राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा भाजपच्या बाळा भेगडेंना पुन्हा दे धक्का; 17 जागांवर विजय...भाजपला अवघी एकच

दरम्यान, सुरुवातीलाच अमरसिंह पंडित यांच्या आघाडीची एक जागा बिनविरोध निघाली. निवडणुकीच्या प्रचारात अमरसिंह पंडित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली. निवडणुकीत एकत्र पॅनल असले तरी लक्ष्मण पवार व बदामराव पंडित टिका होईल म्हणून प्रचारात एकत्र आले नाहीत.

Bazar Samiti Result :
Bazar Samiti Result : अजितदादांकडून शिवतारेंना पुन्हा धोबीपछाड; नीरेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

दरम्यान, १७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले आणि शनिवारी निकाल जाहीर झाला. यात अमरसिंह पंडित यांच्या आघाडीच्या उमेदवारांनी लक्ष्मण पवार व बदामराव पंडित यांच्या आघाडीचा दारुण पराभव केला. सहकारी संस्था मतदार संघात अमरसिंह पंडित यांच्या आघाडीच्या उमेदवारांचे मताधिक्क्य सातशेंहून अधिक आहे.

Bazar Samiti Result :
Beed Bazar Samiti Result : महाविकास आघाडी तीन, तर भाजपकडे अवघी एकच बाजार समिती; काय सांगतोय बीडचा निकाल?

पंडित यांच्या आघाडीच्या उमेदवारांनी नऊशेंचा पल्ला पार केला. तर, पवारांच्या आघाडीच्या उमेदवारांनी अडीचशेंच्या घरात मते मिळविली. तर, ग्रामपंचायत मतदार संघात देखील हा फरक पावणेचारशे मतांच्या घरात आहे. व्यापारी मतदार संघात देखील तीनशेंपैकी अडीचशेंवर मते मिळवून अमरसिंह पंडित यांच्या आघाडीच्या उमेदवारांनी यश मिळविले. निकालानंतर अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी जल्लोष तर केलाच. शिवाय हाबुक ठोकत विरोधकांना आव्हान दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com