Ajit Pawar : हर्षवर्धन पाटलांच्या 'त्या' वक्तव्याचा आधार घेत अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

Ajit Pawar : 'यंत्रणामार्फत ही कारवाई करण्यात येत असल्याने याला राजकीय रंग आहे का?'
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरांवर ईडीकडून आज छापेमारी करण्यात आली. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यामध्ये 1500 कोटींचा कथित घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी केला होता.

त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, या कारवाईवरून अजित पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ''काही राजकीय पक्षांच्या नेत्यावर अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं आहे. ठाकरे गटातील राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख या आमदारांवर तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र राज्यसरकारच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या तपास यंत्रणा आहेत. त्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात येत असल्याने याला राजकीय रंग आहे का?'', अशी शंका अजित पवार यांनी उपस्थित केली आहे.

Ajit Pawar
NCP News : विक्रम काळेंनी पुन्हा आळवला मंत्रीपदाचा राग, आधी चव्हाणांचे बघा, मग जमलं तर माझंही ..

''तसेच अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावर देखील अशाच प्रकारे कारवाई झाली. मात्र कोणतेही पुरावे तपास यंत्रणांना मिळाले नाही. संजय राऊत यांच्यासोबत देखील असंच झालं. हा जो प्रकार सध्या सुरू आहे. तो प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारा नाही'', असं पवार म्हणाले.

तसेच या तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाई वरून हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत ते म्हणाले, ''आधी आमच्याकडे असणारे मात्र आता भाजपमध्ये असणाऱ्या एक नेत्यांनी म्हटलं होतं, भाजपमध्ये मी निवांत आहे. आता शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही काही नाही, असा दाखला देत अजित पवारांनी सरकारला चांगलच सुनावलं.

Ajit Pawar
Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळले, शिंदे फडणवीस सरकारला दिलं खुलं आव्हान

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते?

''भाजपमध्ये मी निवांत आहे. आता शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही काही नाही'', असं वक्तव्य भारतीय जनता पक्षामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी काही दिवसांपूर्वी मावळमधील एका खासगी कार्यक्रमात बोलताना केलं होतं. दरम्यान, आता अजित पवार यांनी त्यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com