Bamb : माघार घेणार नाही, शिक्षकांचा मोर्चा बेकायदेशीर..

जिल्हा परिषदेतील शिक्षक मुलांना गुणवत्तापुर्वूक शिक्षण दिले जात नाही. आमदार, खासदार, लोकप्रतिनिंधीची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जात नाहीत. (Mla Prashant Bamb)
Bjp Mla Prashant Bamb
Bjp Mla Prashant BambSarkarnama

औरंगाबाद : शिक्षक आणि शिक्षक, पदवीधर आमदारांनी प्रशांत बंब यांच्या विरोधात मोर्चा काढला. त्यानंतर बंब चांगलेच भडकले, त्यांनी (Teacher)शिक्षकांनी काढलेला मोर्चा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली. शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा उपस्थितीत करत (Prashant Bamb) आमदार प्रशांत बंब यांनी मोहिम छेडली आहे. यातून शिक्षक, संघटना तसेच शिक्षक व पदवीधर आमदार यांच्यात संघर्ष पेटला आहे.

आज शिक्षक, पदवीधर व शिक्षक आमदारांनी (Aurangabad)औरंगाबादेत मोर्चा काढला. मोर्चा संपताच बंब यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत शिक्षक व मोर्चाला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरलेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांवरही हल्लाबोल चढवला.

बंब म्हणाले, मला आमदारकी चाटायची नाही, शिक्षकांचा मोर्चा बेकायदेशीर होता. त्यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही झाली पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर आमदार हे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहेत. हे आमदार शिक्षकांच्या जीवावर निवडून येण्यासाठी खोटे बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा, मतदारसंघ आता रद्द केलेच पाहिजेत.

माझ्यावर शिक्षणाचे खाजगीकरण करण्यासाठी कटकारस्थान, प्यादा असल्याचा आरोप केला जातोय. पण मला त्याची अजिबात गरज नाही, कारण माझी एकही शाळा नाही. उलट शिक्षक आमदारांच्याच शैक्षणिक संस्था शाळा आहेत. लोकप्रतिनिधी असून ते शाळा, संस्था कशा उघडू शकतात ? असा आरोप देखील बंब यांनी केला. याच लोकांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचे खाजगीकरण केले आहे.

Bjp Mla Prashant Bamb
Osmanabad : गद्दारांनी पन्नास खोक्यांसाठी इमान विकले, निवडणुकीत धडा शिकवू..

संस्थांच्या नावावर सरकारी तिजोरीतील पैशांवर डल्ला मारण्याचे काम हेच लोक करत असल्याची टीका देखील बंब यांनी केली. मी जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी भूमिका घेतली आहे. सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी कधी शिक्षकांचे प्रश्न सोडवले का? सरकारी तिजोरीतील सगळे पैसे शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात, त्याचा राज्यावर आर्थिक बोजा पडतो, असेही बंब म्हणाले.

जिल्हा परिषदेतील शिक्षक मुलांना गुणवत्तापुर्वूक शिक्षण दिले जात नाही. आमदार, खासदार, लोकप्रतिनिंधीची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जात नाहीत. माझे आव्हान आहे कोणत्याही २० शाळा निवडाव्या आणि तेथील शिक्षणाचा दर्जा तपासा. जे सत्य समोर येईल त्यानंतरच माझी भूमिका सगळ्यांना पटेल. कितीही दबाव आणला, आंदोलने केली तरी मी मागे हटणार नाही, पिढ्या बरबाद होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत बंब यांनी आक्रमक पावित्रा घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in