मराठवाड्यातील बडा नेता महादेव जानकरांची साथ सोडणार!

राष्ट्रीय समाज पक्षाचे भूममधील बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Balasaheb Patil Hadogrikar
Balasaheb Patil HadogrikarSarkarnama

भूम (जि. उस्मानाबाद) : नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला उस्मानाबाद जिल्ह्यात धक्का बसणार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हे जानकर (mahadev jankar) यांची साथ सोडून लवकरच काँग्रेस (congress) पक्षात घरवापसी करणार आहेत. त्याबाबतची चर्चा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासोबत आज झाली. (Balasaheb Patil Hadogrikar of Rashtriya Samaj Party will soon join Congress)

काँग्रेस प्रवेशासंदर्भात बोलताना बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी सांगितले की, (स्व.) इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसचे आणि आमच्या घराचे संबंध आहेत. भूम तालुक्यात काँग्रेस मोठी करण्यात आमचे मोठे बंधू शंकरराव पाटील हाडोंग्रीकर यांचा सिंहा वाटा आहे. आम्ही काँग्रेस विचारांची माणसं असल्याने मी फक्त विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून दुसऱ्या पक्षात गेलो होतो. मी आजही काँग्रेस पक्षाचा असून उद्याही काँग्रेस पक्षाचाच राहाणार आहे. लवकरच काँग्रेस प्रवेशाची रूपरेषा ठरवून आगामी निवडणुका वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखील लढविण्यात येतील.

Balasaheb Patil Hadogrikar
निधीसाठी राष्ट्रवादी अन्‌ मतदानाला अपक्ष, असे यापुढे चालणार नाही : भरणे, मोहितेंनी टोचले कान!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पक्षांतराचे पेव फुटले आहे. भूम तालुक्यातील आदर्श छावणी चालक आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हे घरवापसी करणार असल्याने भूम तालुका काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Balasaheb Patil Hadogrikar
राष्ट्रवादीचा अशोक चव्हाणांना झटका : शिवसेनेच्या मदतीने माहूरचे नगराध्यक्षपद पटकावले!

काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात संदर्भात चर्चा करण्यासाठी भूम तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हे मुरुम येथे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील यांची भेट घेतली. या वेळी बाळासाहेब हाडोंग्रीकर यांचा सत्कार करून पक्षप्रवेशासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, मोईज सय्यद, रोहन जाधव, विलास शाळू, रुपेश शेंडगे, गणेश शेंडगे, प्रभाकर डोंबाळे आदीसह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com