Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar : `बाळा`, तुझी खूप आठवण येईल, धानोरकरांच्या निधनाने इम्तियाज जलील भावूक..

Aimim : एक अतिशय सभ्य, नेहमी हसतमुख आणि खरा आहार घेणारा. बाळा तुझी आठवण येईल. देव तुमच्या कुटुंबाला शक्ती देवो.
Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar News
Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar NewsSarkarnama

Marathwada : चंद्रपूरचे काॅंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. (Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar) अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे ते एकमेव खासदार होते. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील बाळू धानोरकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून सांगितल्या.

Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar News
Balu Dhanorkar Passed Away : अशोक चव्हाणांच्या व्हायरल कॉलने धानोरकरांना काँग्रेसचे तिकिट मिळाले अन् इतिहास घडला...

`अविश्वसनीय! बाळा धानोरकर यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. अवघ्या ४८ व्या वर्षी त्याचे अचनाक जाणे यावर विश्वास बसत नाही. ते महाराष्ट्रातून काँग्रेस (Congress) पक्षाचे एकमेव खासदार होते. एक अतिशय सभ्य, नेहमी हसतमुख आणि खरा आहार घेणारा. बाळा तुझी आठवण येईल. देव तुमच्या कुटुंबाला शक्ती देवो.`, अशा शब्दात इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी बाळू धानोरकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केले.

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात वयाच्या ४७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यानं उपचार सुरु होते.

धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वीच त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com