नाराज बाबाजीनी दुर्राणींची जयंत पाटील, अजितदादा करणार मनधरणी

मुंबईतील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Babajani Durrani
Babajani DurraniSarkarnama

परभणी : पक्षांतर्गत बंडाळीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांना पक्षश्रेष्ठींनी सोमवारी (ता. २९ नोव्हेंबर) मुंबईला बोलावले आहे. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांची दुपारी तीन वाजता त्यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे. तसेच मंगळवारी ते अजित पवारांशी (Ajit pawar) चर्चा करणार आहेत, त्यामुळे मुंबईतील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Babajani Durrani will have a meeting with Jayant Patil in Mumbai on Monday)

आमदार दुर्राणी यांनी १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावर पक्षश्रेष्ठींनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता मुंबईत सोमवारी त्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बैठक होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतही ३० नोव्हेंबर रोजी बाबाजानी चर्चा करणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार बाबाजानी दुर्रानी यांना काँग्रेस, शिवसेना व भाजप या तीनही पक्षामधून ऑफर येत आहे. सर्वधर्म समभाव बाळगणारे दुर्रानी यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी अनेक पक्षांनी पायघड्या घालण्यास सुरूवात केली आहे. दुर्राणी यांनी १६ नोव्हेंबर रोजी आपल्यापदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु, आठ दिवस त्यांनी या राजीनाम्याबद्दल गुप्तता पाळली होती. मात्र आठ दिवसानंतर त्यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली होती. दुर्रानी यांच्यासारखा अनुभवी राजकारणी नेता पक्ष सोडणार म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Babajani Durrani
हवेली पंचायत समितीचे भाजपचे सदस्य श्याम गावडे यांचा तडकाफडकी राजीनामा

बाबाजानी यांचे नेतृत्व व्यापक आणि सर्व-जाती धर्मीयांशी सलोख्याचे संबंध हे त्यांचे वैशिष्ट समजले जाते. त्यामुळे त्यांना मानणारा विशिष्ट वर्ग प्रत्येक पक्षात आहे. त्यामुळेच गेल्या सात वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. परंतु, गेल्या एक-दीड वर्षापासून पक्षातील जिल्हास्तरावर होत असलेली अंतर्गत बंडाळी बाबाजानी दुर्रानी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे अखेर वैतागून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुर्राणी हे पक्षही सोडणार, अशा चर्चाही जिल्ह्यात सुरू आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना, काॅंग्रेसह विरोधी पक्ष भाजपने देखील दुर्राणी यांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाबाजानी यांना फोनवरून संपर्क साधला असून त्यांची विचारपूस केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

Babajani Durrani
मी भारतनानांचा बछडा; एवढ्या सहजासहजी मैदान सोडणार नाही

केवळ ही चर्चा विचारपूस करण्यापर्यंतच मर्यादित नव्हती, तर पटोले यांनी दुर्राणी यांना काॅंग्रेसमध्ये येण्याची आॅफर दिल्याची देखील माहिती आहे. याशिवाय शिवसेना व भाजपचे राज्यातील मोठे नेतेदेखील दुर्राणी यांची मनधरणी करत असल्याचे बोलले जाते. दरम्यान, दुर्राणी यांनी आपण गेल्या ४० वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करतो आहोत. यापुढेही पक्षात एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबायला तयार नाहीत. ता. ३० नोव्हेंबरला आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दुराणी यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे मुंबईतील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com