Imtiaz Jalil : जाती-धर्माच्या नावावर मतदान करणारे औरंगाबादकरही पाणी प्रश्नाला जबाबदार..

भाजपकडून मोर्चात सहभागी होणाऱ्या महिलांना हंडे वाटप करण्यात येत आहे. कदाचित त्यासाठी थोडी गर्दी होईलही. परंतु यातून नागरिकांना पाणी मिळणार नाही. (Aimim)
Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्न चिघळण्यास जसे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप हे राजकीय पक्ष जबाबदार आहेत, तेवढेच निवडणुकीत जाती-धर्माच्या, औरंगाबाद- (Aurangabad) संभाजीनगरच्या नावावर मतदान करणारी औरंगाबादची जनता देखील जबाबदार आहे, असा आरोप खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला आहे. शहरातील नागरिकांनी हिंदुत्व, जाती-धर्मा ऐवजी पाण्यासाठी मतदान केले असते तर आज ही परिस्थिती उद्धभवली नसती, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी चार वाजता औरंगाबादेत पाण्यासाठी जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाने काहीच साध्य होणार नाही, ही केवळ नौटंकी आहे, असा आरोप करत मोर्चामुळे पाणी मिळणार असेल तर औरंगाबादकर नागरिक म्हणून मी देखील या मोर्चात सहभागी होईल, असे म्हणत इम्तियाज यांनी भाजपवरही (Bjp) निशाणा साधला.

प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, पाण्यावरून अचानक भाजपने आंदोलन कसे काय सुरू केले. त्यानंतर शिवसेनेने ५० टक्के पाणीपट्टी कपातीचा निर्णय घेत आम्ही खूप उपकार केल्याचा आव आणला. पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे, मग तीन वर्षा आधी पाणीपट्टी कमी का केली नाही ? हे न समजण्या इतकी औरंगाबादची जनता दुधखुळी नाही. निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय घेतले तरी लोकांना ते आता लक्षात येते.

इतकी वर्ष भाजप शिवसेनेसोबत महापालिकेच्या सत्तेत होती, त्यामुळे शिवसेना-भाजप हे दोन पक्षच पाणी प्रश्नाला जबाबदार आहेत. मग मोर्चा कोणत्या तोंडाने काढत आहेत. फडणवीस यांचा हा मोर्चा म्हणजे नौटंकी आणि शक्तीप्रदर्शन आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, महिला या मोर्चात सहभागी होणार नाही.

भाजपकडून मोर्चात सहभागी होणाऱ्या महिलांना हंडे वाटप करण्यात येत आहे. कदाचित त्यासाठी थोडी गर्दी होईलही. परंतु यातून नागरिकांना पाणी मिळणार नाही. मोर्चा ऐवजी महापालिका, जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असती, तर त्यात सहा महिने, वर्षभरात पाणी कसे देता येईल यावर चर्चा करता आली असती.

Mp Imtiaz Jalil, Aurangabad
काँग्रेसला 'एक व्यक्ती-एक पद' चा विसर ; संकल्पाला पक्षश्रेष्ठींनी दाखवली केराची टोपली !

पण मोर्चा काढून यांना घाणेरडे राजकारण करायचे आहे. शिवसेना म्हणते हा आमचा गड आहे, तर भाजप म्हणते आमचा गड आहे. यांच्या भांडणात औरंगाबादची जनता गाडली जात आहे, याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला. महापालिकेत एमआयएम विरोधी पक्षात होती तेव्हा आमच्या नगरसेवकांनी वेळोवेळी पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे, आंदोलने केली आहे.

राहिला प्रश्न समांतरचा तर ती खाजगी कंपनी नफा कमावण्याच्या हेतून शहरात येणार होती, त्यामुळे नागरिकांची प्रचंड लूट झाली असती म्हणून आम्ही समांतरला विरोध दर्शवला होता, असे स्पष्टीकरण देखील इम्तियाज यांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com