Aurangabad : आमदार बंब यांचा मुद्दा शिक्षणमंत्री गांभीर्याने घेणार का ?

शिंदे-फडणवीस सरकार असल्यामुळे बंब यांचे पारडे जड ठरते? की मग भविष्यात शिक्षक मतदार नाराज होऊ नये म्हणून सरकार सावध भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Mla Prashant Bamb)
Mla Prashant Bamb Meet Education Minister Deepak Kesarkar News
Mla Prashant Bamb Meet Education Minister Deepak Kesarkar NewsSarkarnama

औरंगाबाद : गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रं सादर करून घरभाडे घेतात, शासनाची फसवणूक करतात असा गंभीर आरोप बंब यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. (Teacher) तेव्हापासून बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष सुरू आहे. तीन आठवडे झाले तरी हा वाद काही केल्या मिटत नाहीये. आता हाच मुद्दा घेऊन (Prashant Bamb) प्रशांत बंब यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली.

शिक्षक संघटना, शिक्षक, पदवीधर आमदार या मुद्यावरून बंब यांना घेरण्याच्या तयारीत असतांनाच बंब यांनी थेट शिक्षण मंत्र्यांच्याच कोर्टात हा चेंडू टाकला आहे. आता (Deepak Kesarkar) केसरकर हा चेंडू टोलावतात का? त्यावर षटकार ठोकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा मुद्दा उपस्थितीत करत आमदार बंब यांनी राज्यातील वातावरण चांगलेच तापवले आहे.

केवळ मुख्यालयी राहण्याचा मुद्दाच नाही, तर त्याआडून शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती आणि गुणवत्तेवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थितीत केले आहेत. आपण केलेले आरोप कसे खरे आहेत हे दाखवून देण्यासाठी बंब यांनी आपल्याच मतदारसंघात गांधीगिरी करत मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व पूजन करत भांडाफोड केला होता.

पिढी बरबाद करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक व पदवीधर आमदार पाठीशी घालतात असा आरोप करत त्यांचे मतदारसंघच रद्द करा, अशी खळबळजनक मागणी करत बंब यांनी शिक्षक व पदवीधर आमदारांना देखील अंगावर घेतले. त्यामुळे संतापलेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांनी देखील बंब यांच्या विरोधात आक्रमक होत येत्या ११ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.

Mla Prashant Bamb Meet Education Minister Deepak Kesarkar News
Bhagwat Karad : '..एकतरी भाजपवाला दाखवा ; कराडांचे इम्तियाज जलीलांना आव्हान

या पार्श्वभूमीवर बंब यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेत दबाव तंत्राचा वापर केल्याची चर्चा होत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असल्यामुळे बंब यांचे पारडे जड ठरते? की मग भविष्यात शिक्षक मतदार नाराज होऊ नये म्हणून सरकार सावध भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in