Aurangabad : औरंगाबादकरांचे `पाणी` कोणाची सत्ता बुडवणार ?

स्मार्ट सिटी, सुपर संभाजीनगर हे कानाला ऐकायला गोड वाटणारे शब्द असले तरी प्रत्यक्षात शहर स्मार्ट किंवा सुपर आहे का? (Municipal Corporation)
Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal CorporationSarkarnama

औरंगाबाद : संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादकरांच्या पाणी प्रश्नावरच्या सहनशिलतेचे कौतुकच करावे लागेल. (Aurangabad) पाणी, कचरा, रस्ते या मुलभूत प्रश्नांवरुन कितीही त्रास झाला तरी निवडणुकीच्या वेळी ते सगळं विसरून भावनिक राजकारणाला बळी पडायचे आणि पाच वर्ष पुन्हा तेच भोगायचे याची सवय येथील जनतेला झाली आहे की काय ? (Municipal Corporation) असेही आता बोलले जाते.

शहराच्या महापालिकेवर गेली २५ वर्ष शिवसेना-भाजप (Shivsena-Bjp) या दोनच पक्षांची सत्ता होती, परंतु या काळात औरंगाबादकरांची तहान पुर्णपणे भागवण्यात या सत्ताधाऱ्यांना काही यश आलेले नाही. (Marathwada) विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात एकदा नव्हे तर दोनवेळा राज्यात या पक्षाची सत्ता होती, पण या सत्तेचा उपयोग औरंगाबादकरांना पाणी मिळवून देण्यात झाला नाही. आता पुन्हा महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे.

आठवड्याला, दहा दिवसांना पाणी मिळत असले तरी औरंगाबादकर विनातक्रार ते घेत आहेत. तर दुसरीकडे राजकारण्यांकडून यावर्षी पाणी देणार, पुढच्या वर्षी देणार, इतक्या कोटींची योजना मंजुर अशा थापा मारणे काही थांबत नाहीये. आतातर ज्यांनी मिळून सत्ता उपभोगली ते शिवसेना भाजप हे दोन पक्षच एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहे. त्यामुळे औरंगाबादकरांच्या नशिबी पाण्याची वणवण कायमच राहणार असे दिसते.

सध्या शहारात पाणी प्रश्न पेटला आहे, पण तो पेटवला तो राजकारण्यांनी स्वःताच्या स्वार्थासाठी. इतकी वर्ष सत्तेत असूनही पाणी न मिळण्याला जेवढी शिवसेना जबाबदार आहे, तेवढीच भाजप देखील. पण आता विरोधात असल्यामुळे भाजपने आपल्या विरोधाची धार तेज करत शिवसेनेची सत्ता घालवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सत्ताधारी शिवसेना-भाजप विरोधी पक्ष एमआयएम आणि ज्या राष्ट्रवादी-काॅंग्ेसचे महापालिकेत फारस संख्याबळ नाही, त्यांनी देखील पाण्यासाठी फार आक्रमक भूमिका घेतली असे पहायला मिळाले नाही.

आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आणि ज्या शिवसेनेचा भगवा महापालिकेवर कायम फडकत आला आहे, त्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात जाहीर केलेली १६८० कोटींची पाणी पुरवठा योजना अजूनही पुढे सरकलेली नाही. कुरघोडीच्या राजकारणात या योजनेचा बळी जातो की काय अशी परिस्थीती आहे. नाही म्हणायला पालकमंत्री सभाष देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः योजनेकडे लक्ष दिलो आहे असे सांगितले जाते.

Aurangabad Municipal Corporation
उर्जा विभागाची तत्परता! थकीत वीजबिलाच्या यादीतून अजित पवारांचे नाव २ तासात हटवलं

परंतु ज्या कासवगतीने या योजनेचे काम सुरू आहे ते पाहता आणखी तीन वर्ष तरी शहराती नागरिकांना मुबलक पाणी मिळेल अशी स्थिती नाही. पाणीपट्टी पुर्ण आणि पाणी मात्र दहा दिवसाआड ही परिस्थीती कायम आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवू पाहणाऱ्या शिवसेना आणि तेव्हा सत्तेत पण आता विरोधात असलेल्या भाजपला देखील हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. पण मग प्रश्न असा आहे? मत द्यायचे कोणाला ? तर या प्रश्नावर आता औरंगाबादकरांना ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

स्मार्ट सिटी, सुपर संभाजीनगर हे कानाला ऐकायला गोड वाटणारे शब्द असले तरी प्रत्यक्षात शहर स्मार्ट किंवा सुपर आहे का? हा प्रश्न राजकारण्यांनी आणि इथे राहणाऱ्या नागरिकांनी देखील स्वतःला विचारला पाहिजे. मग याला जे कुणी जबाबदार आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे. पण नेहमी खान पाहिजे की बाण ? या राजकारण्यांच्या खेळात औंरगाबादकर अडकतात आणि फसतात. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत औरंगाबादकर पाणी प्रश्नवारून कोणाला बुडवतात ? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com