Aurangabad : पैठणला पूर्णवेळ तहसिलदार कधी मिळणार ?

सुनील केंद्रेकर हे या प्रकरणाची दखल घेऊन पैठणला पूर्णवेळ तहसीलदार पदावर एखाद्या महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार की हा गोंधळ असाच चालू ठेवणार? (Aurangabad)
Divisional Commissinoer Sunil Kendrekar
Divisional Commissinoer Sunil KendrekarSarkarnama

औरंगाबाद : पैठण तालुक्याचे तहसीलदार पद सहा महिन्यापासून रिक्त आहे .महसूल खात्याच्या बड्या अधिकाऱ्यांना पैठणच्या तहसीलदार पदासाठी सक्षम व्यक्ती अजूनही कशी सापडली नाही याविषयी तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे. (Paithan) पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर खाजगी व्यक्ती मार्फत सव्वा लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात २३ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या संदर्भातील अहवाल शासनाकडे गेल्यानंतर शेळके यांना निलंबित करण्यात आले होते. महसुल विभागाने केलेल्या चौकशीत मात्र शेळके यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. (Aurangabad) एवढेच नव्हे तर त्यांचे निलंबनही मागे घेण्यात आले. परंतु ते मागे घेत असतांना शेळके यांना अन्य विभागात अकार्यकारी पदावर बदली करण्याची शिफारस चौकशी समितीने करून ठेवली आहे. (Marathwada)

चौकशी समितीने वरिष्ठांच्या दबावापुढे शेळके यांना क्लीन चिट दिलेली असली तरीही त्यांची बदली अकार्यकारी पदावर करण्याची मेख मारून ठेवली अशी चर्चा महसूल वर्तुळात आहे . जर शेळके यांना क्लीन चीट देण्यात आली, तर मग त्यांची बदली अकार्यकारी पदावरच करावी, असे का नमूद करण्यात आले?असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

दुसरीकडे पैठणचे तहसिलदार पद रिक्त का ठेवण्यात आले ? असा प्रश्न विचारला जात आहे. महसूल खात्यामध्ये पैठणच्या तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळू शकतील असे कर्तबगार आणि कार्यक्षम अधिकारी नाहीत काय असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो आहे. २२ आॅक्टोबर रोजी पैठण येथे नारायण वाघ नावाच्या खाजगी व्यक्ती मार्फत १ लाख ३० हजारांची लाच स्वीकारण्याच्या आरोप तत्कालीन तहसीलदार शेळके यांच्या विरुद्ध झालेला आहे.

Divisional Commissinoer Sunil Kendrekar
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला लाच मागणारा पोलिस गजाआड

लाचलूचपत विभागाने सापळा रचून वाघ याला अटक केल्यानंतर शेळके यांच्या सांगण्यावरूनच त्याने लाच स्वीकारल्याची कबुली दिली होती. त्यानंतर शेळके यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे शेळके यांच्या चेंबरमध्येच हा सगळा प्रकार घडला होता. लाचलुचपत विभागातील अत्यंत कर्तबगार अधिकाऱ्यांना आरोपी लाच घेताना सापडल्यानंतर प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यासाठी २४ तास लागले होते.

या काळात नेमके काय काय झाले हा एका कादंबरीचा विषय ठरू शकेल असे याप्रकरणाची इत्यंभूत माहिती असणारे काहीजण खासगीत सांगतात. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी असा नावलौकिक असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे या प्रकरणाची दखल घेऊन पैठणला पूर्णवेळ तहसीलदार पदावर एखाद्या महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार की हा गोंधळ असाच चालू ठेवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com