Aurangabad : विरोधक आक्रमक झाल्याने आघाडी नको म्हणणारे एकत्र..

पंचीवस वर्ष महाविकास आघाडी भक्कम राहणार असे दावे करणारे त्यांचे नेते सत्ता गेल्यावर मात्र सैरभर झाले. (Mahavikas Aghadi)
Mahavikas Aghadi Protest Agianst Shinde-Fadanvis Government News.
Mahavikas Aghadi Protest Agianst Shinde-Fadanvis Government News.Sarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सत्तातंरानंतर महाविकास आघाडी विखुरल्याचे चित्र होते. अडीच वर्ष सत्तेत एकमेकांच्या मांडीला माडी लावून बसलेले (Mahavikas Aghadi) शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रसेचे नेते अभावानेच एकत्र दिसले. (Bjp)भाजपवर स्वतंत्रपणे टीका करतांना हे नेते दिसले असले तरी महाविकास आघाडी सरकार असतांनाचे बाॅन्डिंग पहायला मिळाले नाही.

एकनाथ शिंदे यांचे बंड, ठाकरे सरकार पायउतार होणे, शिवसेनेत उभी फूट, त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामंपचायत निवडणुका व त्याचे हाती आलेले निकाल यानंतर राजकीय गणित बदलू लागली आहेत. (Aurangabad) भाजपने शिवसेनेचे पुरती कोंडी केल्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेडशी केलेली युती सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी होती.

या नव्या युतीवर भाजपने सडकून टीका केली, तर काॅंग्रेस-राष्ट्रवादीने याकडे तटस्थ पाहणेच पसंत केले. भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले असले तरी राष्ट्रवादीला बारामतीतच पराभूत करण्याची रणनिती देखील आखली आहे. तर काॅंग्रेसचे भाजपला आव्हानच वाटत नाही. केंद्र आणि राज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे भाजप महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांवर कुरघोडी करू पाहत आहे.

त्यामुळे पंचीवस वर्ष महाविकास आघाडी भक्कम राहणार असे दावे करणारे त्यांचे नेते सत्ता गेल्यावर मात्र सैरभर झाले. परंतु शत्रू चालाख आणि धुर्त असल्यामुळे आघाडी नको म्हणणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आता एकत्रित आंदोलन करतांना दिसत आहेत.

Mahavikas Aghadi Protest Agianst Shinde-Fadanvis Government News.
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

औरंगाबाद येथे शिवसेना- राष्ट्रवादी, काॅंग्रेस व संभाजी ब्रिगेड या पक्षांनी अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नावर आंदोलन केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे, राष्ट्रवादीचे कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकार असतांना देखील हे तीन्ही नेते आंदोलनात कधी एकत्र दिसले नव्हते. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची भाषा आघाडीच्या नेत्यांमध्ये सूरू झाली होती. परंतु सत्ता गेल्यानंतरचे हि चत्र बरेच बोलके म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in