Aurangabad : ठोंबरे काका-पुतण्याच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील मिळेना..

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चिकटगावंकर व ठोंबरे यांच्याशी समोरासमोर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजते. (Ncp Aurangabad)
Congress Leader Pankaj Thombre-Ncp Leader Bhausaheb Chikatraongkar News
Congress Leader Pankaj Thombre-Ncp Leader Bhausaheb Chikatraongkar NewsSarkarnama

औरंगाबाद : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे व त्यांचे पुतणे पंकज ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत (Ncp) प्रवेश करायचा आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह ठोंबरेचे पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र त्यांना अद्याप हिरवा कंदील मिळत नाहीये. वैजापूर तालुक्यातील काँग्रेस (Congress) फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

कधीकाळी तालुक्यात काँग्रेसची मोठी ताकद होती, परंतु कालांतराने ती घटली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काँग्रेसला तालुक्यात फारसे यश मिळवता आलेले नाही. (Aurangabad) पुढील राजकीय भवितव्य लक्षात घेता भाऊसाहेब ठोंबरे व त्यांचे पुतणे व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज ठोंबरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ठोंबरेंकडून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. परंतु राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व ठोंबरे यांच्यातून विस्तव देखील जात नसल्यामुळे ठोंबरेंचा पक्षप्रवेश काहीसा लांबला. ठोंबरे काका-पुतणे शेकडो समर्थकांसह पुण्यात पोहचल्याची माहिती आहे.

पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार यांच्या उपस्थीती भाऊसाहेब व पंकज ठोंबरे हे आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुर्तास ठोंबरे काका-पुतण्यासह त्यांच्या समर्थकांना वाट पाहण्यास सांगितल्याचे समजते.

Congress Leader Pankaj Thombre-Ncp Leader Bhausaheb Chikatraongkar News
Osmanabad : शिंदेसेना बाळासाहेब, दिघेंच्या विचारांची नाही ; तर मोदी, शहांच्या विचारांची..

वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन मोठे आहे. भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्या रुपाने राष्ट्रवादीने २०१४ मध्ये या मतदारसंघात विजय देखील मिळवला होता. ठोंबरे व चिकटगांवकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नेमकी हीच अडचण असल्यामुळे ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाला अद्याप हिरवा कंदील मिळत नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे यांच्यासह काँग्रेसचे १३ सरपंच आणि विविध २०० पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. आज होणारा प्रवेश सोहळा रद्द झाल्याची माहिती असून उद्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चिकटगावंकर व ठोंबरे यांच्याशी समोरासमोर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in