Aurangabad : ईडी, सीबीआयने भाजप नेत्यावर कारवाई केल्याचे दाखवा, एक लाख मिळवा..

अनेक राज्यांमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत`. (Aurangabad Ncp)
Ncps Attractive poster in Aurangabad News
Ncps Attractive poster in Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजप दबावाचे राजकारण करत आहे. (ED Action) ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा अक्षरशः घरगड्या सारखा वापर सुरू असल्याचा आरोप करत (Ncp) राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेश सचिवाने एक भन्नाट आॅफर देत भाजपला आव्हान दिले आहे.

`जे कोणी मला भाजपा नेत्यावर या केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्याचं दाखवेल. अथवा भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई झाल्याचं दाखवून देईल त्या नागरिकाला मी एक लाख रुपये बक्षीस देणार आहे. (Aurangabad) या संधीचा फायदा घेऊन अशी कारवाई दाखवण्याचा किमान भाजपा कार्यकर्त्यांनी तरी प्रयत्न करावा, असं माझं त्यांना आवाहन आहे`, अशा आशयाचे पोस्टर शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी शहरातील क्रांती चौकात हे भाजपाविरोधी पोस्टर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या पाठींब्यावर सत्तेत आलेल्या भाजपविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप केला जातो.

सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना अडकविण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांच्यांवरील कारवाईनंतर पुन्हा केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता संजय राऊत असे विरोधी पक्षातील तीन बडे नेते आता जेलमध्ये आहेत. भाजपकडून विरोधकांच्या विरोधात जे ईडीचे अस्त्र वापरले जात आहे, नेमकं यावर बोट ठेवत अक्षय पाटील याने झळकवलेले पोस्टर निश्चितच विचार करायला लावणारे ठरत आहे.

Ncps Attractive poster in Aurangabad News
मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत मला शिक्षणमंत्री करा : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्र..

`या देशात ऐतिहासिक बहुमताने भाजपाचं सरकार सत्तेत आलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत`, अशी टीका देखील या माध्यमापातून पाटील यांनी केली आहे. आज देशात ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणाचे प्रमुख भाजपाच्या घरगड्यांप्रमाणे वागत आहेत. ईडी ही भाजपाची दुसरी शाखाच झालीय असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

जे कोणी मला भाजपा नेत्यावर या केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्याचं दाखवेल. अथवा भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई झाल्याचं दाखवून देईल. त्या नागरिकाला मी एक लाख रुपये बक्षीस देणार आहे. या संधीचा फायदा घेऊन अशी कारवाई दाखवण्याचा किमान भाजपा कार्यकर्त्यांनी तरी प्रयत्न करावा, असं माझं त्यांना आवाहन आहे, असे पाटील यांनी आपल्या या पोस्टर लावण्याच्या संकल्पनेबद्दल सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com