Aurangabad : सत्तारांचा निशाणा शिरसाटांवर ? पण ते काहीच बोलेना..

Sanjay Shirsat : उपऱ्या सत्तारांमुळे शिरसाटांना दोन पावले मागे यावे लागले. याचे शल्य शिरसाट यांना असल्याचे बोलले जाते.
Sanjay Shirsat-Abdul Sattar News, Aurangabad
Sanjay Shirsat-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Marathwada Political : शिंदे बंडातील महत्वाचे शिलेदार म्हणून ज्या आमदार संजय शिरसाट यांच्याकडे पाहिले गेले, तेच कालांतराने पक्षात बाजूला पडले. मंत्रीपदाच्या आशेने मुंबईत कुटुंब आणि समर्थकांसह पोहचलेल्या शिरसाटांना तेव्हा (Abdul Sattar)अब्दुल सत्तारांसाठी वेटिंगवर ठेवण्यात आले. त्यानंतर ना मंत्रीमंडळ विस्तार झाला, ना शिंदेंनी शिरसाटांना दिलेले आश्वासन पुर्ण झाले. त्यामुळे सहाजिकच शिरसाट दुखावले गेले आहेत.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News, Aurangabad
Beed : ठाकरेंना पत्र लिहून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवासैनिकाला, शिंदे गटाकडून मदतीचा हात..

पण अजूनही त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर (Eknath Shinde) विश्वास असल्यामुळे ते अधून-मधून आपल्या नाराजीची आठवण एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाला दांडी मारत करून देत असतात. शिंदेवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करता येत नसली तरी ज्यांच्यांमुळे आपल्याला वेटींगवर ठेवले गेले, त्या पक्षातील सहकाऱ्यांबद्दल मात्र ते उघड भूमिका घेतांना दिसतात. (Sanjay Shirsat) मंत्रीमंडळ आकाराला येत असतांना दोघांपैकी कोणा एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा शिंदेंनी सत्तारांना झुकते माप दिले होते.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर उशीरापर्यंत रंगलेल्या नाराजी नाट्याच्या चर्चा देखील बाहेर आल्या होत्या. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असल्यामुळे शिंदे यांना सत्तारांना टाळने शक्य नव्हते आणि घडलेही तसेच. पण यामुळे शिरसाटांची मंत्रीपदाची संधी मात्र हुकली. तेव्हापासून सत्तार आणि शिरसाट यांच्यात फारसे सख्य राहिले नाही. दोघेही एकमेकांना टाळण्याचा सातत्याने प्रयत्न करतांना दिसले.

नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात अब्दुल सत्तार अडचणीत सापडले होते. पण शिंदे-फडणवीसांनी त्यांना या संकटातून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सिल्लोड येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थितीत असूनही शिरसाट गेले नाही. यावरून विचारणा झाली तेव्हा, अब्दुल सत्तारांनी शिरसाट यांचे नाव घेतले पण मी कुणाचेही नाव घेत नाही, असे म्हणत माझ्याच पक्षातला एक नेता, ज्याला मंत्रीपद मिळाले नाही, तोच विरोधात काम करत असल्याचा आरोप केला.

सत्तारांचा निशाणा संजय शिरसाट यांच्यावरच होता हे स्पष्ट होते. माझे मंत्रीपद गेले तर त्या नेत्याला मंत्रीपद मिळेल असे वाटत असल्यामुळेच हे प्रकार सुरू असल्याचे देखील सत्तार यांनी सांगितले. शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत बंद खोलीत झालेली चर्चा पाच मिनिटात माध्यमांपर्यंत कशी पोहतचे? असा सवाल करत देखील सत्तारांनी शिरसाटांकडे बोट दाखवले. नाव न घेता जे साध्य करायचे ते सत्तारांनी साध्य केलेच. मुख्यमंत्र्यांना आपण सगळे सांगतिले आहे, ते चौकशी करणार आहेत, असेही सत्तारांनी स्पष्ट केले. यानंतर शिंदे गटातील कुरबुरीच्या चर्चा सुरू झाल्या.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News, Aurangabad
Aurangabad : महावसुलीचे आरोप असलेल्या कृषी महोत्सवाकडे फडणवीसांनी पाठ फिरवली..

विरोधकांनी देखील याला हवा देण्याचा प्रयत्न केला. यावर शिरसाट यांनी मात्र चुप्पी साधली आहे. प्रसार माध्यमांशी देखील ते बोलत नाहीयेत. यावरून शिरसाटांना काही बोलू नका, अशा सूचना मुख्यमत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत की काय? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्यांशी संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते मुंबईत असल्याची माहिती आहे.

शिरसाट हे मुळेचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनचे जुने शिवसैनिक. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये न्याय (मंत्रीपद) मिळाला नाही म्हणून त्यांनी मोठी जोखीम पत्करत शिंदेना साथ दिली. पण इथेही उपऱ्या सत्तारांमुळे शिरसाटांना दोन पावले मागे यावे लागले. याचे शल्य शिरसाट यांना असल्यामुळेच ते सत्तार आणि त्यांच्या कार्यक्रमांना जाणे टाळत असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in