Aurangabad : पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद अन् मराठवाड्यात शांतता ...

मनसेचे शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी पहाटेच्या अजानचा आवाज कमी ठेवल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आभार मानले. (MNS)
Aurangabad : पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद अन् मराठवाड्यात शांतता ...
Police Alert in MarathwadaSarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे च्या सभेत ४ तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर दुप्पट आवाजात हुनमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. (MNS) त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा देखील दाखल झाला. मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना नोटीस देखील बजावली. (Raj Thackeray) पण त्यानंतरही ते हनुमान चालीसा वाजवण्यावर ठाम होते.

राज्यातील मनसैनिक आणि हिंदुत्वावादी जनतेला आवाहन करत त्यांनी आज मशिदीसमोर हुनमान चालीसा वाजवण्याचे आवाहन केले होते. (Aurangabad) परंतु राज ठाकरे यांच्या आवाहनाला राज्यात व मराठवाड्यात अत्यअल्प प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. यामागे पोलिसांकडून करण्यात आलेली कायदेशीर कारवाई व मुस्लिम समाजाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून देत केलेल्या सूचनेला मिळालेलला प्रतिसाद यामुळे मराठवाड्यात (Marathwada) सर्वत्र शांतता आहे.

दुपारपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. औरंगाबाद, बीड, लातूर, नादेड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, जालना या सर्वच जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या अजनाचा आवाज रोजच्या पेक्षा कमी होता. जालना तालुक्यातील जयपूर गावातील अपवाद वगळता मराठवाड्यात कुठेही मनसे किंवा अन्य कुठल्याही व्यक्ती, संघटनांकडून मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यात आला नाही.

मशिदीमधून दिल्या जाणाऱ्या अजानचा आवाज देखील रोजच्या पेक्षा कमी होता, असे देखील बोलले जाते. राज ठाकरे यांनी ४ मे रोजी मशिदींसमोर हनुमान चालीसा व मंदिरांमध्ये महाआरती करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी कालपासूनच प्रतिंबधात्मक कारवाई म्हणून मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली होती. तर हजारो मनसैनिकांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या.

एकीकडे ही कायदेशीर कारवाई करत असतांना पोलिसांनी मशिदीमधील मौलवी व कमिटीच्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांनाही भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशाची आठवण करून देत आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन केले. त्याला देखील मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिला. पहाटेच्या अजानाच्यावेळी ते ठिकठिकाणी दिसूनही आले. त्यामुळे सर्वत्र शांतता कायम होती, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Police Alert in Marathwada
त्यांना संपवण्याची हीच वेळ, खरी समस्या भोंगे नाही; नितेश राणे आक्रमक

पोलिस सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, कुठल्याही परिस्थीतीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करत आहे. औरंगाबाद शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कालच नोटीसा बजावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शहरात देखील कुठेही मशिदीसमोर आज हनुमान चालीसा लावण्यात आली नव्हती. या उलट मनसेचे शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी पहाटेच्या अजानचा आवाज कमी ठेवल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आभार मानले.

मुस्लिम आणि हिंदू समाजातील लोकांनी जो पाठींबा दिला त्याबद्दल आपण दोघांचे आभार मानतो असे खांबेकर यांनी म्हटले आहे. मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला अटक झालेली नाही, आम्हाला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.