Aurangabad : खरचं बागडेंना लढाईचे नाही ? की त्यांनी गुगली टाकली..

हरिभाऊ बागडे यांनी दोन वर्षाआधीच आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे बागडे यांच्या या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. (Haribhau Bagde)
Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Mla Haribhau Bagde News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : फुलंब्रीचे भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिवाळी पहाट निमित्त आयोजित कार्यक्रमात यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली. तसेच इच्छुकांना ईश्वर तुमचं भलं करो असा आशीर्वाद रुपी टोमणाही मारला. बागडे यांच्या निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली. शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस त्यांची मनधरणी करण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू होता. बागडेंना खरंच निवडणूक लढवायची नाही, की मग त्यांनी आपल्याला मतदारसंघात किती पाठिंबा आहे याची चाचपणी केली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Osmanabad : पाटील पुन्हा ठरले हिरो ; एकाच आंदोलनाने दोन लाख शेतकऱ्यांचं चांगभलं..

हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) हे जनसंघापासून कार्यरत आहेत, त्यामुळे पक्षात त्यांना एक वेगळा मान-सन्मान नेहमीच दिला जातो. २०१४ मध्ये जेव्हा राज्यात युतीचे सरकार आले, तेव्हा सभागृहाच्या सर्वोच्च पदाचा म्हणजेच विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान पक्षाच्या वतीने त्यांना देण्यात आला. (Aurangabad) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचा विषय जेव्हा निघाला तेव्हा देखील आज चर्चेत असलेली नावे इच्छूक म्हणून समोर आली होती. परंतु नानांना उमेदवारी मिळणार असेल तर आम्ही माघार घेऊ अशी त्यांची भूमिका असायची.

त्यामुळे वयाचा मुद्दा गौण ठरवत भाजपने बागडेंच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधातील ही लढत बागडेंनी जिंकली आणि ते पुन्हा आमदार झाले. दुर्दैवाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि नानांचे मंत्रिपद हुकले. विरोधी पक्षात असल्यामुळे आणि कोरोना या महामारीच्या दृष्ठचक्रात राज्य अडकल्याने मतदार संघात फारसा विकास करता आला नाही. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनाक्रमांमुळे राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर आली परंतु यावेळी ती बॅक सीटवर असल्यामुळे निधीच्या बाबतीत फारशी परिस्थिती बदललेली नाही.

२०२४ च्या निवडणुकांचा विचार करता हरिभाऊ बागडे यांनी दोन वर्षाआधीच आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे बागडे यांच्या या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी बागडेंना थांबण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळेच कदाचित बागडेंनी कधी थांबायचे हे आपल्याला कळते असे म्हणत इच्छूकांच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे संकेत दिले.

मात्र बागडेंच्या घोषणेनंतर समर्थकांकडून त्यांची सुरू असलेली मनधरणी पाहता बागडेंचा हा निर्णय होता की गुगली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण यानंतर बांगडे यांची भाषा काहीशी बदलल्याचे दिसते. पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल अशी नवी भूमिका ते घेताना दिसत आहेत. म्हणजेच पक्षाने उमेदवारी दिली तर बागडे पुन्हा मैदानात दिसले तर नवल वाटायला नको. त्यामुळे इच्छुकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असल्या तरी २०२४ उजाडेपर्यंत त्यावर कधीही विरजण पडू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in