Aurangabad : त्याचा एकच धंदा, राजकीय नेत्यांना फोन लावून भंडावून सोडणे..

रमेशने नांदगावकरांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला. मी मनसेचाच कार्यकर्ता आहे, पण सक्रीय नाही, अशी कबुली देत त्याने साधलेला संवाद सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (Aurangabad)
Aurangabad Political News
Aurangabad Political NewsSarkarnama

औरंगाबाद : समाजात विविध प्रकारचे लोक असतात, कोणी रागीट, गमतीदार, भोळसर, चाणाक्ष्य तर कोणी निव्वळ रिकामावेळ आहे म्हणून इतरांना भंडावून सोडण्याचा छंद जोपासणारे. असाच एक अवलिया तरुण (Aurangabad) औरंगाबादेत सध्या धुमाकूळ घालतो आहे. रमेश पाटील नावाचा हा तरुण अनेक पक्षांमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर सध्या केवळ राजकीय नेत्यांना फोन करून जाब विचारणे, राजकीय भूमिका काय असावी? वार्डातील समस्या याविषयी सल्ला देण्याचे काम करतो आहे.

रमेश विनायक पाटील सर्वप्रथम चर्चेत आला, तो महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा प्रकारचे बॅनर झळकावल्यामुळे. (Marathwada) औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गुलमंडी भागात रमेशने हे बॅनर लावले होते. (Sanjay Shirsat) तीन आपत्य असल्यामुळे महापालिका निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशी जाहिरात करत त्याने फोन नंबर देखील प्रसिद्ध केला होता.

या आगळ्या वेगळ्या बॅनरची चर्चा झाली नाही तर नवलच. प्रसार माध्यमांनी देखील याची दखल घेतली आणि त्याचा फटका रमेशला बसला. भाजपच्या महिला आघाडीने गुलमंडीवर जावून हे बॅनर फाडत रमेश पाटलाच्या फोटोला काळे फासले. महिलांचा अपमान करणाऱ्या रमेश पाटील विरुद्ध कारवाईची मागणी करत महिलांनी आंदोलनही केले. अगदी महिला आयोगाने देखील याची दखल घेतली आणि रमेशवर गुन्हा दाखल झाला.

या प्रकारानंतर रमेशचे हे खुळ जाईल अशी अपेक्षा, पण तो काही थांबला नाही. मग त्याने गुलमंडीवर आसपासच्या व्यापाऱ्यांसाठी असलेल्या मुतारीचा विषय हाती घेतला. महापालिकेने ही मुतारी हटवल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याचा दावा करत त्याने लोकप्रतिनिधींना फोन लावायला सुरूवात केली. आमदार संजय शिरसाट, हरिभाऊ बागडे यांना फोन करून मुतारीचा प्रश्न सोडवा, अशी मागणी त्याने लावून धरली होती.

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी धावपळ करत असणाऱ्या शिरसाट यांना रमेश पाटील यांनी फोन करून ` साहेब तेवढं मुतारीच बघा ना`, अशी विनंती केली होती. तेव्हा वैतागलेल्या शिरसाटांनी आता तुला लंघुशंकेला जागा नाही, तर माझ्या घरी येवून कर, अशा शब्दात सुनावले होते.

असाच काहीसा अनुभव आमदार बागडे यांना देखील आला. बागडे यांना फोन करून पाटील याने असेच भंडावून सोडले होते. महापालिकेचा विषय आहे, तिकडे जाऊन तक्रार कर मी फोन करतो, अशी समजूत घालून देखील पठ्ठ्या ऐकायला तयार नव्हता. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचा फोन द्या, मी त्यांना बोलतो असे म्हणत रमेशने नानांना छळले. तेव्हा वैतागलेल्या नानांनी शहरातील मुतारीचा प्रश्न का रेल्वे मंत्र्याचा आहे का? असा सवाल त्याला केला होता?

त्यावर मग काय झाले, मी पंतप्रधान मोदींना देखील फोन करू शकतो, असे म्हटल्यावर मग बागडेंनी देखील कपाळावर हात मारून घेतला होता. आता या यादीत आणखी एक नवे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पुर्व निवडणूकीत भाजपने उमेदवार देवू नये असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. त्यानंतर झालेल्या घडामोडी सगळ्यांनाच माहित आहे.

Aurangabad Political News
Omraje : विरोधकांनो पेज हॅक कराल, लोकांच्या मनातील प्रतिमा कशी डिलीट करणार?

या दरम्यानच, रमेशने नांदगावकरांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला. मी मनसेचाच कार्यकर्ता आहे, पण सक्रीय नाही, अशी कबुली देत त्याने साधलेला संवाद सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात भाजपच्या पटेल यांनी माघार घेतली नाही, तर राज ठाकरे साहेबांनी शिवसेना म्हणून नाही, पण मराठी महिला म्हणून ऋतूजा लटके यांना पाठिंबा द्यावा, असा सल्ला रमेशने नांदगावकरांना दिला.

त्यावर आपल्याला जे करायचे होते ते आपण केले, ती बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत नांदगावकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही राज साहेबांना सांगा, असा आग्रह रमेशने धरला. यावर वैतागलेल्या नांदगांवकरांनी त्याला आपला खाक्या दाखवत फोन कट केला.

तर असा हा रमेश काही मोठा पदाधिकारी नाही, की कोणत्या पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता नाही. पण राजकीय नेत्यांचे मोबाईल नंबर मिळवणे, त्यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलून भंडावून सोडणे हा जणू त्याचा छंदच झाला आहे. विशेष म्हणजे या संभाषणाच्या आॅडिओ सोशल मिडियावर व्हायरल करत चर्चेत राहण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com