Aurangabad : राज गर्जना झाली, पण शिवसेना, उद्धव ठाकरेंवर टीका न करता..

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय त्यांनी जोरकसपणे मांडला. यावेळी अजान सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चांगलेच भडकले. ( Raj Thackeray)
Aurangabad : राज गर्जना झाली, पण शिवसेना, उद्धव ठाकरेंवर टीका न करता..
Raj Thackeray-Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गर्जना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जोरात झाली. (MNS) राष्ट्रवादी, शरद पवार आणि मशिदीवरील भोंग्याचा विषय त्यांनी आक्रमकपणे मांडला. पण या राज गर्जनेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्यावर कुठलीही टीका करण्यात आली नाही हे विशेष.

राज ठाकरे (Raj Thackaray) यांच्या औरंगाबादेतील सभेकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे लक्ष लागले होते. तुडुंब भरलेल्या गर्दीसमोर भाषण करतांना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. (Maharashtra)

भाषणातील बहुतांश वेळ त्यांनी राष्ट्रवादीमुळे सुरू झालेले जातीपातीचे राजकारण यावर प्रहार करतांनाच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात चार तारखेनंतर ऐकणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला. गुडीपाडव्याच्या सभेत पहिल्यांदा राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थीत केला होता.

परंतु याच सभेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत टीका केली होती. ठाण्याच्या सभेत देखील त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. औरंगाबादच्या सभेत मात्र राज ठाकरे यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भ्र शब्द देखील काढला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray
ठाकरे सरकारवर राज्यपाल खूश; महाराष्ट्र दिनी केला कौतुकाचा वर्षाव

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय त्यांनी जोरकसपणे मांडला. यावेळी अजान सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चांगलेच भडकले. त्यांनी पोलिसांना आताच जाऊन ही बांग बंद करा, त्यांच्या तोंडात बोळा कोंबा नाहीतर त्यानंतर महाराष्ट्रात जे होईल ते मला माहित नाही, असे म्हणत थेट इशाराच दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.