Aurangabad : राजकारण्यांनो बॅनरबाजी करु नका, जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आवाहन..

राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंघोषित दादा, भाऊ बेकायदा पोस्टर, बॅनर, झेंडे लावून शहराचे विद्रुपीकरण करतात. अशांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. (Municipal Corporation)
Municipal Corporation Appeal News, Aurangabad
Municipal Corporation Appeal News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : जी-२० परिषदेच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे शहरात साफसफाई, अनाधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स काढण्याची कारवाई सुरू आहे. शहरात राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणात बॅनर्स होर्डिंग लावतात. त्यामुळे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १६) विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे.

Municipal Corporation Appeal News, Aurangabad
Marathwada : `भारत जोडो`च्या उत्कृष्ट नियोजनानंतर चव्हाणांवर आणखी एक मोठी जबाबदारी..

जी-२० परिषदेत सहभागी देशांच्या प्रतिनिधीचे शिष्टमंडळ शहराला भेट देणार आहे. त्यानुसार महापालिकेने (Municipal Corporation) तयारी सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून शहरातील बेकायदा पोस्टर, बॅनर हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम १८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. (Aurangabad) या मोहिमेनंतर शहरात बेकायदा बॅनर, पोस्टर आणि फलक लावल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जातील किंवा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा इशारा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना दिला आहे.

बेकायदा पोस्टर, बॅनर, फलक लावण्यामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे असतात. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी उद्या बुधवारी (ता. १६) विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनात दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत राजकीय पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींना बेकायदा पोस्टर न लावण्याचे आवाहन केले जाणार आहे.

तसेच कायद्यातील तरतुदींचीही माहिती दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंघोषित दादा, भाऊ बेकायदा पोस्टर, बॅनर, झेंडे लावून शहराचे विद्रुपीकरण करतात. बेकायदा पोस्टर, बॅनर, फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

त्यानुसार आता महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे यापुढे राजकीय पक्षांनी बेकायदा होर्डिंग, फलक, बॅनर्स लावू नयेत, असे आवाहन यावेळी केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in