Aurangabad Political : दानवे मुलीला आमदार करूनच थांबणार ? कन्नडमध्ये हायवोल्टेज ड्रामा होणार..

Kannad Constituency : संजना जाधव यांचे देखील कन्नड दौरे यापुढे आणखी वाढतील असा दृष्टीने कार्यक्रम आखले जात आहेत.
Raosaheb Danve-Sanjana jadhav Political News, Aurangabad
Raosaheb Danve-Sanjana jadhav Political News, AurangabadSarkarnama

Marathwada News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या विरोधकांना नामोहरम केल्याशिवाय शांत बसत नाहीत हे त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवरून स्पष्ट होते. (Jalna) जालना लोकसभा मतदारसंघावर गेल्या ३० वर्षापासून दानवे यांचे एकहाती वर्चस्व आहे. जिल्ह्यात त्यांनी आपल्याला तगडा प्रतिस्पर्धीच तयार होवू दिला नाही. ज्यांनी आव्हान देण्याची भाषा केली, त्यांनाच घरी बसवले याची अनेक उदाहरणे सांगता येतील.

Raosaheb Danve-Sanjana jadhav Political News, Aurangabad
Shivsena : सत्तारांचा कृषी महोत्सव वादात ; दानवे म्हणाले, अन्नदात्याचे खिसे कापू पाहत आहेत..

त्यापैकी ताजे उदाहरण म्हणजे अर्जून खोतकर. अब्दुल सत्तार यांच्या नादाला लागत खोतकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंना (Raosaheb Danve) आव्हान देण्याचे धाडस केले होते. पण दानवेंनी त्यांचा असा काही काटा काढला की त्यांना माजी आमदार व्हावे लागले. आता दानवे यांचे टार्गेट आहे, ते कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. (Harshavardhan Jadhav) मुलगी संजना जाधव हिला आमदार करण्याचा विडा दानवे यांनी उचलला आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

तशा संजना जाधव या कन्नड तालुक्याच्या सून असल्यामुळे आधीपासूनच राजकारणात सक्रीय होत्या. त्यांचा दांडगा संपर्क असल्यामुळे काही काळ तालुक्यापासून लांब राहूनही त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पिशोरमध्ये यश मिळवले होते. कौटुंबिक वादामुळे त्या कन्नड-सोयगांव मतदारसंघापासून लांब होत्या, पण कार्यकर्ते आणि समर्थकांच्या माध्यमातून अनेक उपक्रम, कार्यक्रम आणि त्याला उपस्थितीत राहत त्यांनी कन्नडशी असलेली नाळ तुटू दिली नव्हती.

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले विशेष लक्ष कन्नड मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. एवढेच नाही तर त्यांचे या मतदारसंघाती दौरे देखील वाढले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत संजना जाधव या आवर्जून असतात. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कायम माजीच राहावेत या दृष्टीने दानवे यांनी पावले टाकायला सुरूवात केली आहे.

लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने हर्षवर्धन जाधव हे काहीसे खचले. त्यानंतर कौटुंबिक वाद त्यांची पाठ सोडत नसल्याने त्यांच्या मागे असणारा समर्थकांचा गराडा देखील काहीसा कमी होतांना दिसतो आहे. अशावेळी जाधव यांना आणखी खिंडीत गाठण्यासाठी दानवेंनी हालचाली सुरू केल्या आहेत. मुलगी संजना जाधव यांना कन्नडमधून विधानसभेवर पाठवण्यासाठी दानवे यांनी भाजपच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे आदेशच दिले आहेत.

Raosaheb Danve-Sanjana jadhav Political News, Aurangabad
Arjun Khotkar : गोरंट्याल म्हणजे गटार गंगा, आता त्यांची प्रकरणं बाहेर काढतो..

संजना जाधव यांचे देखील कन्नड दौरे यापुढे आणखी वाढतील असा दृष्टीने कार्यक्रम आखले जात आहेत. हर्षवर्धन जाधव यांची धरसोडीची भूमिका दानवे आणि संजना जाधव यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मला आता स्वतःसाठी राजकारणात काहीच नको, २०२९ मध्ये तुम्हाला हवा असणारा आमदार आदित्यवर्धनच्या रुपाने तुम्हाला जाधव कुटुंब देईल, अशी विधाने मध्यंतरी जाधव यांनी केली होती.

परंतु येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा हायवोल्टेज ड्रामा कन्नडमध्ये दिसण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन विरुद्ध संजना जाधव असा तो असेल. कोणत्याही परिस्थितीत मुलीला आमदार करायचेच, असा चंगच रावसाहेब दानवे यांनी बांधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com