..तर पाच वर्षांपर्यंत सजा होऊ शकेल, राज ठाकरेंना पोलिसांनी आधीच इशारा दिलाय!

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलिसांनी विविध अटी लादल्या आहेत.
..तर पाच वर्षांपर्यंत सजा होऊ शकेल, राज ठाकरेंना पोलिसांनी आधीच इशारा दिलाय!
Raj Thackeray sarkarnama

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्‍या सभेला अखेर पोलिस आयुक्तांनी तब्बल १६ अटी-शर्तींवर गुरुवारी (ता. २८) रात्री परवानगी दिली. त्यामुळे शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी होणाऱ्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सभेच्या मैदानावर ‘मनसे’तर्फे तयारी सुरू झाली असून आज काही साहित्य तिथे आणण्यात आले. (Raj Thackeray Aurangabad Rally)

औरंगाबादचे पोलिस (Aurangabad Police) आयुक्त सभेच्या निर्णयाबाबत निर्णय घेतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत, काही अहवाल मागवून चर्चा केली आणि आज रात्री सभेला परवानगी दिल्याचे परिपत्रक जारी केले.

Raj Thackeray
Video: राज ठाकरे यांच्या सभेसाठी बाळा नांदगावकर यांनी केली मैदानाची पाहणी


सभेसाठी असलेल्या अटी
- मैदानाची आसनक्षमता १५ हजार जणांची असून त्याहून अधिक जणांना निमंत्रित करू नये. ढकलाढकली, अव्यवस्था, गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाल्यास संयोजकांना जबाबदार धरण्यात येईल.
- सभास्थानी व्यवस्थेसाठी पोलिस दलाकडून बॅरिकेटस् उभारण्यात येतील.
- सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म आदी किंवा ते पाळत असणाऱ्या परंपरांवरून कोणत्याही व्यक्ती वा समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागेल.
- सभेदरम्यान ध्वनिक्षेपकाचा आवाज निवासी क्षेत्रासाठी ५५, शांतता क्षेत्रासाठी ५० आणि व्यापारी क्षेत्रासाठी ६५ डेसिबल असेल. त्याचा भंग झाल्यास पाच वर्षे तुरुगंवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

Raj Thackeray
परवानगी मिळो न मिळो राज ठाकरे सभा घेणारच; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं...

- सभेला येताना आणि परतताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी व असभ्य वर्तन करणार नाही, याची दक्षता पक्षाला घ्यावी लागेल.
- येताना-परतताना कोणत्याही प्रकारची रॅली काढता येणार नाही.
- अटींचे उल्लंघन केल्यास सर्व संयोजक वा वक्त्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई होईल.

Raj Thackeray
राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांचा अल्टीमेटम मागे घेतील?

सभेला गालबोट लावू नका!
सभेची तयारी पूर्ण झाली आहे. आपल्याला पोलिसांना सहकार्य करायचे आहे. सभेला वाजतगाजत या; पण गालबोट लागेल, कोणाला त्रास होईल, अशा गोष्टी करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसैनिकांना गुरुवारी दिल्या. सभेला ढोल-ताशांच्या गजरात या. गुलाल उधळत या; परंतु हे लक्षात ठेवा की आपल्या पक्षात सर्वच जाती-धर्माचे लोक आहेत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.