
Marathwada News : मराठवाडा स्माॅल स्केल इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर असोसिएशन (मसिआ) च्या वतीने ५ ते ८ जानेवारी दरम्यान (Aurangabad) औरंगाबादच्या आॅरिक सिटीमध्ये महाराष्ट्र एक्सपो २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ काॅन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या औरंगाबादेत येत आहेत.
या शिवाय शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री तसेच केंद्रातील मंत्री देखील उपस्थीत राहणार आहेत. हे प्रदर्शन ३० एकरवर भरवण्यात आले आहे. ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून (Marathwada) मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑनलाइन पद्धतीने अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचे उद्घाटन करणार आहे.
तर समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित होणार आहे. ५ ते ८ जानेवारी दरम्यान ऑरिक सिटी, शेंद्रा येथे एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन देणे, लघुउद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, तसेच नवीन उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देणे हे प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे.
'मसिआ' सोबत महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, एमआयडीसी आणि ऑरिक सिटीच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसांत १ लाख अभ्यागतांनी भेट देणे अपेक्षित असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांचा सहभाग, औद्योगिक क्षेत्राशी निगडित सेमिनार, परिसंवाद, कार्यशाळा, व्हेंडर डेव्हलपमेंट व बीटूबी प्रोग्रामचे आयोजन आदी या एक्स्पोची वैशिष्टे असणार आहेत. मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारतवर भर, ऑरिकसह इतर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी विशेष कक्षही इथे असेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.