Aurangabad : मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस
औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेली भाजप आणि उद्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होणारी जाहीर सभा या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपच्या (Bjp) काही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावलल्या आहेत. सिटीचौक पोलिसांकडून या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. भाजपने मात्र हा दडपशाहीचा प्रकार असून पाण्यासाठी आंदोलन करतच राहू, तुरूंगात जावे लागले तरी मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एप्रिल महिन्यात पाणी प्रश्नावरून भाजपने सिडको येथील जलकुंभावर आणि त्यानंतर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. (Aurangabad) या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. (Shivsena) याचाच संदर्भ देत भाजप पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, दहशत निर्माण होऊ शकते असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
१११ अंतर्गत बजावण्यात आलेल्या या नोटीसीमधील भाषेवर भाजपने आक्षेप नोंदवला असून नागरिकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांनी मुस्काटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्याच्या सभेपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना धमकावण्याच काम पोलिसांमार्फत महाविकास आघाडी सरकार आणि शहरातील शिवसेनेचे नेते करू पाहत आहेत.
पाणी प्रश्न चिघळलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी कमी होईल याची भिती शिवसेनेला आहे आणि म्हणूनआता भाजपा पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत असल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला आहे. जनसामान्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. तरीही आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्यावर तुम्ही कितीही दडपशाही केली तरी आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास तयार आहोत, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.