Aurangabad : नशिबी चोवीस तास पाणी नाहीच ? पाणी पुरवठा योजना समांतरच्या वळणार !

Marathwada : पाण्यावरून बदनामी होत असल्याने शहरात उद्योग येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation NewsSarkarnama

Water Issue News : शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरच विघ्न सुरूच आहे. समांतर पाणी पुरवठा योजनेनंतर आता नवी पाणीपुरवठा योजना (Water Supply) देखील वादात सापडत आहे. या योजनेची देखील समांतर होणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. २००६ पासून समांतर पाणी पुरवठा योजनेचा प्रवास सुरू झाला. ही योजना पूर्ण झाल्यास २४ तास सात दिवस नागरिकांना पाणी मिळेल, असे स्वप्न दाखविण्यात आले. पण २०२३ उजाडत असताना देखील हे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

Aurangabad Municipal Corporation News
Winter Session : मागणी रेटली अन् औरंगाबादला महिला कृषी महाविद्यालय मिळाले..

समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर (Aurangabad) औरंगाबाद सीटी वॉटर युटिलिटी कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने मुख्य जलवाहिनीसह शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे काम सुरू केले. पण पुढे (Municipal Corporation) महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने राजकारण पेटले व कंपनीच्या कामाची गती संथ असल्याची ओरड सुरू झाली. त्यानंतर दीड वर्षात प्रशासनाने २०१६ मध्ये युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द केला व समांतर योजना बारगळली.

२०१९ मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. पण प्रत्यक्षात २०२१ पासून या योजनेचे काम सुरू झाले. पण समांतरच्या वेळी झालेला प्रकार यावेळी देखील सुरू आहे. या कामाची गतीही संथच आहे. आताही नेमके त्यावरच बोट ठेऊन प्रशासनातील एक गट योजनेचे कंत्राट रद्द करण्याच्या दृष्टीने विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तसे झाल्यास शहर पुन्हा शहर मागे जाणार आहे. पुन्हा नवीन निविदा काढणे, नवीन कंत्राटदार नियुक्त करणे अशी प्रक्रिया करण्यात मोठा वेळ जाण्याची शक्यता आहे. समांतर पाणी पुरवठा योजनेचे काम महापालिकेमार्फत हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या योजनेवरून मोठा राजकीय धुरळा उडाला. जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असताना पाणी पुरवठा योजनेवरून आरोप-प्रत्यारोप झाले व समांतर बंद पडली.

त्यामुळे नागरिकांच्या माथी पाणीटंचाईचे संकट कायम राहिले. विशेष म्हणजे पाणी टंचाईचे शहर म्हणून औरंगाबादची सर्वत्र बदनामी होत आहे. एकीकडे शहरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर विकसित होत असताना दुसरीकडे पाण्यावरून बदनामी होत असल्याने शहरात उद्योग येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यावेळी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. महापालिका दूर असताना देखील वाद मात्र कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in