Aurangabad : एनआयएची मराठवाड्यातही मोठी कारवाई ; वीस जणांना घेतले ताब्यात..

एटीएसच्या एका पथकाने गुरुवारी (ता.२२) पहाटे परभणी शहरातील मोमीनपुरा, लोकमान्यनगर व जाकीर हुसेन नगर या भागात छापामारी केली. (Marathwada News)
NIA, ATS Raid In Marathwada News
NIA, ATS Raid In Marathwada NewsSarkarnama

औरंगाबाद : पाॅप्युलर फ्रंट या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या माहितीवरून देशभरासह महाराष्ट्र व (Marathwada) मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने धाडी टाकत तब्बल २० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. (ATS) मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यातून या संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

देशभरात आज एनआयए ,एटीएसकडून छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. (Aurangabad) औरंगाबादेत एटीएसकडून चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तर मराठवाड्यातून एकूण २० जणांवर एटीएसने कारवाई तर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.

दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने एएनआयने एकाचवेळी देशभरात कारवाई सुरू केली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबादेत एटीएसने जिन्सी परिसरातून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून बुधवारी रात्रभर ही कारवाई सरू होती.

त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील एटीसच्या पथकाकडून शहराच्या विविध भागात झाडाझडती सुरू होती. ताब्यातील चौघा संशयितांची नावे मात्र समजू शकलेली नाहीत. यासंदर्भात एटीएस पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली सध्या देशभरात पाॅप्युलर फ्रंटच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात येत आहेत.

जिन्सी परिसरात हे कार्यालय असून या कारवाईत चौघे ताब्यात घेतले आहेत. अशाच प्रकारची कारवाई एटीएसने परभणी शहरात देखील केल्याची माहिती आहे. टेंरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने पहाटे शहरातील मध्यवस्तीतून चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. या चौघांची नावे कळू शकलेली नाहीत.

NIA, ATS Raid In Marathwada News
Aurangabad : राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश..

एटीएच्या एका पथकाने गुरुवारी (ता.२२) पहाटे परभणी शहरातील मोमीनपुरा, लोकमान्यनगर व जाकीर हुसेन नगर या भागात छापामारी केली. ठाणे येथील काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात ही यंत्रणा राज्यभरात छापेमारी करत आहे. त्यातंर्गतच परभणी शहरात ही कारवाई करण्यात आली आहे.

नांदेड व औरंगाबाद येथील दहशतवाद विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान परभणीतील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य तिघांना या पथकाने ताब्यात घेतले. लगेचच या चौघांसह हे पथक अज्ञात स्थळी रवाना झाले.

या शिवाय नांदेडमधून सुद्धा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेडच्या देगलूर नाका भागात काल रात्री एटीएसच्या पथकाने छापा टाकत मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले होत. तसेच आणखी तिघांना सुद्धा पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर अखेर या चारही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com