Aurangabad News : हिलरी क्लिंटन औरंगाबादेत दाखल, दोन दिवसात वेरुळ लेणी, घृष्णेश्वराला भेट..

Hillary Clinton :माजी विदेश मंत्री असलेल्या हिलरी क्लिंटन या १९९३ ते २००३ या काळात अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून कार्यरत होत्या.
Americas Hillary Clinton In Aurangabad News
Americas Hillary Clinton In Aurangabad NewsSarkarnama

Marathwada : अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री तथा प्रथम महिला हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) यांचे आज दुपारी औरंगाबादेत विशेष विमानाने आगमन झाले. गुजरात दौऱ्यावर आलेल्या हिलरी यांचे आज औरंगाबादेत विशेष विमानाने आगमन झाले. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान त्यांचा इथे दोन दिवस मुक्काम असणार आहे.

Americas Hillary Clinton In Aurangabad News
Ashok Chavan News : वाढदिवसाच्याच दिवशी थोरातांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा देणे दुर्दैवी..

वेरुळ लेण्या (Marathwada) आणि घृष्णेश्वर मंदिराला त्या भेट देणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, हिलरी यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. (Aurangabad) खुल्ताबाद तालुक्यातील एका फार्मवर त्यांचा मुक्काम असणार आहे. या ठिकाणी देखील विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री असलेल्या हिलरी क्लिंटन या १९९३ ते २००३ या काळात अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून कार्यरत होत्या. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून विशेष विमानाने त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर प्रचंड पोलिस बंदोबस्तात त्या खुल्ताबाद तालुक्यातील ध्यान फार्मस येथे रवाना झाल्याची माहिती आहे.

त्यांचा मुक्काम देखील याच ठिकाणी असणार आहे. उद्या, ८ फेब्रुवारीला त्या घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ लेणीला भेट देतील. ९ रोजी त्या परत विशेष विमानाने परततील. दरम्यान, त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिस दलातील शंभरहून अधिक कर्मचारी, दहा ते पंधरा पोलिस अधिकारी तैनात राहतील. या शिवाय त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, २० पोलिस कर्मचारी, ५ महिला पोलिस कर्मचारी यांचा सशस्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com