Aurangabad News : पक्षाचे नाव, चिन्ह गमावल्यानंतर होतोय निष्ठावंतांचा पहिला मेळावा..

Shivsena : चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंतांच्या मेळाव्याचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.
Uddhav Thackeray Group Meeting In Aurangabad News
Uddhav Thackeray Group Meeting In Aurangabad NewsSarkarnama

Marathwada : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षाचे नाव आणि चन्ह गेले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत निष्ठावंत सैनिकांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पक्ष स्थापनेच्यावेळी जसं कारवर उभ राहून भाषण केलं तस करत जुन्या काळाची आठवण करून दिली. निष्ठावंत शिवसैनिकांनी देखील गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार केला.

Uddhav Thackeray Group Meeting In Aurangabad News
Sanjay Shirsat News : जे जे शिवसेनेचे ते आता आमचे ; शिवसेना भवनावर दावा..

राज्यभरातील नेते, पदाधिकारी त्यावेळी मुंबईत जमले होते. आता याच पद्धतीने उद्धव गटाशी निष्ठा बाळगून असलेल्या निष्ठावंताचे मेळावे जिल्हा, तालुका व गाव पातळीवर घेतले जाणार आहेत. औरंगाबादेत निष्ठावंतांच्या आजच्या मेळाव्याने या मोहिमेला सुरूवात होत आहे. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंतांच्या मेळाव्याचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्यातून भक्कम पाठबळ मिळाले होते. पाच आमदारांनी शिंदेना साथ दिल्यामुळे पक्षाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उद्धव गट आता जोमाने कामाला लागला आहे. इतकी दिवस निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल, शिवसेना, धनुष्यबाण आपल्याचकडे राहिल, अशी आशा उद्धव गट व त्यांचे समर्थक बाळगून होते.

पण निकाल विरोधात गेल्यानंतर आता सर्वेच्च न्यायालयाच्या निकालाकडून फारशा अपेक्षा न ठेवता उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत दिले होते.

त्यानूसार आज दुपारी चार वाजता शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात उद्धव गटाच्या निष्ठावंतांचा मेळावा पार पडणार आहे. विनोद घोसाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थीत होणाऱ्या या मेळाव्यात पक्षाची पुढील दिशा, वाटचाल ठरवली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com