Aurangabad : महापालिकेच्या निवडणुकीत सतरा विघ्न ; प्रारुप आराखडा नव्याने करण्याची मागणी

यापुर्वी प्रसिद्ध झालेला प्रभाग प्रारुप आरखडा हा गोपनियतेचा भंग करणारा आहे. या संदर्भात संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तशीच उच्चस्तरीय समिती नेमूण या संपुर्ण प्रकाराची चौकशी करावी. (Shivsena)
Shivsena Leadar Chandrakant Khaire letter to  Chief Election Commissnoer
Shivsena Leadar Chandrakant Khaire letter to Chief Election CommissnoerSarkarnama

औरंगाबाद : कोरोना आणि न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेली महापालिकेची निवडणूक अजून पाच-सहा महिने होण्याची चिन्ह नाहीत. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणतात त्या प्रमाणे महापालिकेच्या (Municipal Corporation) लग्नात विघ्न येत आहेत. महापालिकेचा गोपनिय प्रारुप आराखडा मध्यमंतरी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

या प्रकरणी महापालिकेतील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अधिकृतपणे महापालिकेने प्रारुप आराखडा जाहीर केला असता तो आणि सोशल मिडियावर व्हायरल झालेला प्रारुप आराखडा सारखाच असल्याचा आक्षेप शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. त्यामुळे हा प्रारुप आराखडा पुर्णपणे रद्द करुन नव्याने तयार करा, अशी मागणी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज्य निवडणुक आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भातील तीन पानी निवेदन खैरे यांनी नुकतेच मुंबईत राज्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन दिले आहे. महापालिकेचा प्रभाग प्रारुप आराखडा सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनियतेचा भंग झाला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे देखील उल्लघंन झाले असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रारुप आराखडा रद्द करून नव्याने तयार करावा, असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

खैरे यांनी दिलेल्या निवेदनात राज्य निवडणुक आयोगाकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणक गटांच्या सिमारेषा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या गटांची लोकसंख्या दर्शवावी, जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात, नकाशावर शहरातील महत्वाची ठिकाणे रस्ते, नद्यानाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे दर्शवावे, नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात, नकाशांचा आकार, त्यावर दर्शवलेले प्रगणक गटांचे क्रमांक,लोकसंख्या इत्यादी तपशील वाचता येईल असा व नकाशे हाताळता यावेत यासाठी दोन किंवा तीन भागात तयार करावेत.

Shivsena Leadar Chandrakant Khaire letter to  Chief Election Commissnoer
MNS : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मिळणार ५४ रुपये लिटर दराने पेट्रोल..

तसेच प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा करावा, त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शवण्यात याव्यात, त्या हद्दीवर असणारे रस्ते, नदीनाले, रेल्वेलाईन इत्यादी स्पष्टपणे असावेत. प्रत्येक प्रभागात समाविष्ट झालेले प्रगणक गट एकच आहेत याची खात्री करावी, तसेच जनगणनेकडून प्राप्त झालेली लोकसंख्या योग्यरितीने दर्शवावी व खात्री करून घ्यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापुर्वी प्रसिद्ध झालेला प्रभाग प्रारुप आरखडा हा गोपनियतेचा भंग करणारा आहे. या संदर्भात संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तशीच उच्चस्तरीय समिती नेमूण या संपुर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी देखील चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com