Aurangabad : आमदणी अठ्ठणी, खर्चा रुपय्या, महापालिका आर्थिक संकटात !

महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिका देणीमुक्त केल्याचा दावा केला होता. (Aurangabad Municipal Corporation)
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation NewsSarkarnama

औरंगाबाद : अत्यल्प वसुली व अवाढव्य खर्च यामुळे महापालिका पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडली आहे. (Aurangabad) महापालिकेचा दर महिन्याचा सुमारे ४५ कोटी रुपये अत्यावश्‍यक खर्च असून, तिजोरीत मात्र जेमतेम ३० कोटी रुपये जमा होत आहेत. त्यामुळे आगामी काळात देणीदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेची (Municipal Corporation) शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. मात्र वसुली आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातच होते. त्यामुळे उर्वरित नऊ ते दहा महिने महापालिकेचे आर्थिक गणित बिघडून जाते. (Marathwada) महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिका देणीमुक्त केल्याचा दावा केला होता.

पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर सुमारे अडीचशे कोटीपर्यंत कंत्राटदारांची देणी होती. दरम्यान दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे शहरात फक्त अत्यावश्‍यक कामेच करण्यात आली. नवीन कामे नसल्यामुळे फक्त देणी देण्याचे काम प्रशासनाने केली. त्यामुळे कंत्राटदाराची संपूर्ण देणी फिटली.

असे असतानाच स्मार्ट सिटी अभियायानाचा महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यामुळे प्रत्येक महिन्याला अडीच कोटींचा हप्ता सुरू झाला. कोरोना संसर्ग कमी झाल्यापासून हळूहळू विकास कामांची गती वाढत आहे. त्यामुळे महापालिकेवरील आर्थिक संकट वाढत आहे.

Aurangabad Municipal Corporation News
Parbhani : शांतता समितीच्या बैठकीतच आमदार गुट्टेंनी केले पोलिसांवर हप्तेखोरीचे आरोप...

प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनासह बॅंकेचे हप्ते व इतर आवश्‍यक खर्च सुमारे ४५ ते ४७ कोटीच्या घरात आहे. त्या तुलनेत शासनाकडून मिळणारे जीएसटीचे २७ कोटीचे अनुदान वगळता मोठ्या उत्पन्नाचा स्रोत महापालिकेकडे नाही. मालमत्ता करापोटी केवळ दोन ते अडीच कोटी महिन्याला तिजोरीत जमा होत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात सुमारे १५ कोटींची तूट येत आहे.

आकडे बोलतात...

कर्मचाऱ्यांचे वेतन- १५ कोटी

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन- ८ कोटी

अडीचशे कोटी कर्जाचा हप्ता- २.५० कोटी

एलईडी कंत्राटदाराचे बिल- ३ कोटी

कर्मचाऱ्यांचे पेन्शन- ४ कोटी

जायकवाडी पाणी वीजबिल- ५ कोटी

महापालिका मुख्यालयासह इतर वीज बिल- १.५० कोटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com