Aurangabad : आमदार शिरसाटांचे मंत्रीपदासाठी मुंबईत शक्तीप्रदर्शन ?

मतदार संघातील पदाधिकारी उद्या मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात सकाळी ८ वाजता जमणार आहेत. ( Mla Sanjay Shirsat)
Mla Sanjay Shirsat, Aurangabad
Mla Sanjay Shirsat, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस गटाचे सरकार राज्यात सत्तारुढ झाले, सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांना पुढील सुनावणीपर्यंत निलंबित करू नये, असे आदेश देत दिलासा दिला. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. (Eknath Shinde) शिंदे गटासोबत गेलेले शिवसेना व अपक्ष, छोट्या पक्षांचे आमदार मिळून संख्या ५० झाली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या गटातून मंत्रीमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार फिल्डींग लावली जात आहे.

शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावत थेट ठाकरेंना अंगावर घेणारे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) मंत्रीपदासाठी आग्रही आहेत. तीन टर्म आमदार असलेल्या शिरसाट यांना महाविकास आघाडी सरकारमध्येच संधी मिळेल अशी अपेक्षा होती. (Shivsena) पण तेव्हा ठाकरेंनी पैठणमधून पाचवेळा विजयी झालेले संदीपान भुमरे यांच्या नावाला पंसती दर्शवत थेट त्यांना कॅबिनेट मंत्री केले होते. त्यामुळे आता आपला नंबर यासाठी शिरसाट यांनी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शहरात दाखल झालेल्या शिरसाट यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना अंगावर घेतले होते. इतर कोणत्याही बंडखोर आमदारांपेक्षा शिरसाट यांचे शहरात स्वागत देखील जल्लोषात झाले होते. आता हीच ताकद आणि शक्तीप्रदर्शन थेट मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर करण्याची तयारी शिरसाट यांनी सुरू केली आहे.

उद्या पश्चिम मतदार संघातील शिवसेना नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, महिला आघाडी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती शिरसाट यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे. शिरसाट यांनी सर्व समर्थक शिवसेना पदाधिकारी-महिला आघाडी यांच्याशी सवांद साधत त्यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे.

Mla Sanjay Shirsat, Aurangabad
Shivsena : खैरे गुरुंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर ; ठाकरे, राऊत, देसाईंनाही दिल्या शुभेच्छा..

त्यानूसार मतदार संघातील पदाधिकारी उद्या मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात सकाळी ८ वाजता जमणार आहेत. कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी काल मुंबईत शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर उद्या संजय शिरसाट हे देखील आपल्या समर्थकांची मुख्यमंत्र्यांसमोर परेड करणार आहेत. मुंबईतील हे शक्तीप्रदर्शन संजय शिरसाटांना मंत्रीपद मिळवून देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in