Aurangabad : मेट्रोच्या डीपीआरचे गडकरींसमोरही सादरीकरण करणार..

गडकरी यांच्यासमोर लवकरच या डीपीआरचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर शहरातील लोकप्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळावा, यासाठी मंत्र्यांच्या भेटी घेतील. (Aurangabad)
Aurangabad Metro News
Aurangabad Metro NewsSarkarnama

औरंगाबाद : वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीला जोडणारा एकच उड्डाणपूल व त्यावर मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोने तयार केलेल्या ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

Aurangabad Metro News
Aurangabad : मैत्रीणीला मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

२४ किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी व मेट्रोसाठी शहरातील सेव्हन हिल व मोंढा नाका उड्डाणपूल पाडावा लागणार असल्याचे डीपाआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Metro Project) शहराची २०५२ पर्यंतची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंत एकच उड्डाणपूल असावा, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. (Aurangabad)

त्यासोबतच शहराचा गतिशीलता आराखडा व मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी एकत्रित डीपीआर तयार करण्याचे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने महामेट्रोची नियुक्ती केली होती. महामेट्रोने एकाच उड्डाणपुलासाठी ३ हजार ६०० कोटी तर मेट्रोचा ३ हजार २०० कोटींचा डीपीआर तयार केला आहे.

सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. या डीपीआरमध्ये एकच उड्डाणपूल बांधताना व मेट्रो रेल्वेसाठी सेव्हनहिल व मोंढानाका येथील उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बैठकीला खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुंडे-मुधोळ तसेच महापालिका, छावणी, स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

डीपीआरनूसार मेट्रोच्या अखंड पुलासाठी क्रांती चौक, सिडकोच्या उड्डाणपुलाला धक्का लागणार नाही. पण महावीर चौकातील उड्डाणपुलाबाबत रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व इतर विभागांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना यावेळी डॉ. भागवत कराड यांनी अधिकाऱ्यांना केली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर लवकरच या डीपीआरचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर शहरातील लोकप्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळावा, यासाठी मंत्र्यांच्या भेटी घेतील, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in