Aurangabad : मेट्रो, अखंड उड्डाणपूल कागदावर, सहा हजार आठशे कोटींचा डीपीआर तयार..

मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात आला असला तरी या प्रकल्पासाठी अनेक अडचणी राहणार आहेत. सर्वात मोठा प्रश्‍न हा एवढा निधी कुठून उभा राहणार? (Aurangabad News)
Aurangabad Metro News
Aurangabad Metro NewsSarkarnama

औरंगाबाद : शहरात वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान मेट्रो रेल्वे व अखंड उड्डाणपुलासाठी सहा हजार ८०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. महामेट्रोतर्फे सोमवारी (ता. ३१) या डीपीआरचे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर सादरीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad Metro News
Shivsena : तेव्हा खैरे म्हणाले होते, सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देवू नका..

शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान २५ किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल व मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आदेश दिले होते.

त्यानुसार स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (Smart City) सविस्तर प्रकल्प आराखडा व शहराचा एकत्रित गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी महामेट्रोला कार्यारंभ आदेश दिले. त्यानुसार महामेट्रोने डीपीआर तयार केला आहे. (Aurangabad) त्यात वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान अखंड उड्डाणपुलासाठी तीन हजार ६०० कोटी तर मेट्रो रेल्वेसाठी ३ हजार २०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. दोन्ही कामांचा सहा हजार ८०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाला आहे.

महामेट्रोने एकच उड्डाणपूल, मेट्रो रेल्वेसेवा व शहराचा गतिशीलता आराखडा तयार केला आहे. या डीपीआरचे सादरीकरण करण्यासाठी कंपनीतर्फे प्रशासकाकडे वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार आता सोमवारी (ता. ३१) स्मार्ट सिटी कार्यालयात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी डीपीआरबद्दलही चर्चाही होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात आला असला तरी या प्रकल्पासाठी अनेक अडचणी राहणार आहेत. सर्वात मोठा प्रश्‍न हा एवढा निधी कुठून उभा राहणार? त्यासोबतच सध्या सुरू असलेल्या शहर विकास आराखड्यात मेट्रोसाठी लागणारी जमीन संपादित करावी लागेल. तसेच छावणी भागातून मेट्रोचा पूल उभारण्याकरिता संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल. या अडचणी लक्षात घेता, ज्या रस्त्यावर भूसंपादनाचा जास्त त्रास होणार नाही, याचा विचार करून डीपीआरमध्ये बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com