सभेपूर्वीच राज ठाकरेंना केलं टार्गेट ; कोण काय म्हणाले ?

राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama

पुणे : महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) आज सांयकाळी औरंगाबादमध्ये सभा होत आहे. राज ठाकरे आपल्या भाषणात कुणाला टार्गेट करणार, अशी चर्चा सुरु आहे. या सभेपूर्वीच काही नेते, संघटनांनी राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोण काय म्हणाले जाणून घेऊया..

याला माकडचाळे म्हणतात..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) : आपण हिंदुत्वाच्या या नव्या खेळाडूंकडे आपण कधी लक्षच देत नाही. हे लोक कधीतरी मराठीचा मुद्दा घेतात. मग इतरांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलण्याबाबत बोलतात. त्यानंतर मध्येच हिंदुत्व, भोंगे असे काही मुद्दे घेतात. असे भोंगेधारी आणि पुंगीधारी खूप पाहिले आहेत. आम्ही मराठी म्हणून इतरांना हाकलून द्यायचं. ते चाललं नाही की मग पुन्हा परत बोलवायचं. हे जे काही चालले आहे याला माकडचाळे म्हणतात.

Raj Thackeray
संसदेत पॉर्न क्लिप पाहणं खासदाराला पडलं महागात ; पक्षातून हकालपट्टी

पैसे देऊन नागरिकांना बोलवलयं..

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire): औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून हा गड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेची पानिपत करण्याची हिम्मत कोणा मध्येच नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी कोणीही करू नये.’ तसेच सभेसाठी भाजप मदत करत असून या सभेसाठी पैसे देऊन नागरिकांना सभा ऐकण्यासाठी बोलवण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला किती जरी नागरिक आले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील.

मी त्याला सोडणार नाही..

शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaekwad) : राज ठाकरेंसह इतरांना भडकावून भाजप राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या शहरात जर कोणीही जातीय दंगे भडकवाण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही. मशिदीवरील भोंगे काढले तर क्रियेला प्रतिक्रीया आल्याशिवाय राहणार नाही.

Raj Thackeray
राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम ; कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल

भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात समजेल

शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai): हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबादपासून संभाजीनगर अशी एकप्रकारची मुक्तता दिली आहे. संभाजीनगरवासीय एकप्रकारे ती आठवण जतन करत आहेत. शिवसेनेचं येथील हिंदुत्वाचं जे नातं आहे ते अभेद्य आहे. ते पुढेही कायम राहिल यात शंका नाही.

आम्हीच कसे हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) : हा दोन भावांमधील झगडा आहे आणि संजय राऊत यांनी दोन्ही भावांना एकत्र बसवून हे भांडणं मिटवायला हवं."मुस्लिम समाजाला कुणीही पंचिंग बॅग समजू नये. कुणाचीही तेवढी हिंमत नाही. सध्या आपण पाहिलं तर एक सगळ्या पक्षांमध्ये एक स्पर्धा लागली आहे की आम्हीच कसे हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे.

परिवर्तनवादी भोंग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) : राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते असून मी हिंदुहृदयसम्राट आहे अशा तोऱ्यामध्ये ते भाषण करताहेत, त्यामुळे ते परिवर्तनवादी भोंगा आहेत या परिवर्तनवादी भोंग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज ठाकरे अयोध्येत चालले आहेत का? याच योगींनी, हनुमान हा मागासवर्गीय आहे आणि तो जंगलात राहणारा प्राणी आहे असं म्हटलं होतं. आज राज ठाकरे कुठल्या तोंडाने जाऊन मोदींचे कौतुक करणार आहेत. त्यांचा नाईलाज असल्याने ते भाजपच्या बाजूने भोंगा वाजवत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com