Aurangabad : होऊ द्या खर्च.. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी ५० खोके..

Municipal Corporation : तब्बल ८३ कामे केली जाणार असून, ४९.८३ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
G-20 News, Aurangabad
G-20 News, AurangabadSarkarnama

G-20 News : भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेतील देशांच्या महिलांचे शिष्टमंडळ औरंगाबादला येणार आहे. त्यानिमित्ताने (Municipal Corporation) महापालिकेने शहरात विविध कामे सुरू केली आहेत. शासनाकडून ५० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील सुमारे ३० कोटी रुपये शिष्टमंडळ ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत, तिथे खर्च केले जाणार आहेत.

G-20 News, Aurangabad
Aimim : सत्तार अडचणीत असतांना देसाईंवर घोटाळ्याचे आरोप ? काय टायमिंग आहे..

रस्त्यांची दुरुस्ती, दुभाजक, फुटपाथ, चौकांचे सुशोभीकरण, रोड फर्निचरची कामे केली जाणार आहेत. (Marathwada) जी-२० परिषदेच्या अनुषंगाने प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी या कामांना मंजुरी दिली आहे. (Aurangabad) तसेच कामे करून घेण्यासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने स्थळपाहणी केल्यानंतर कामे अंतिम करण्यात आली आहेत.

तब्बल ८३ कामे केली जाणार असून, ४९.८३ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. यातील ४२.५८ कोटींच्या कामांना प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार निविदाही काढण्यात आल्या आहेत. रस्ते विभागाअंतर्गत २३.७६ कोटींची ६२ कामे, विद्युत विभागाअंतर्गत ६.९९ कोटींची तीन कामे, उद्यान विभागाअंतर्गत ६.८३ कोटींची १२ कामे, कार्यकारी अभियंता इमारत विभागाअंतर्गत पाच कोटींचे एक काम याप्रमाणे ४२.५८ कोटींच्या ७८ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

ही सर्व कामे अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने करण्यास कंत्राटदारांनी सहमती दर्शवली आहे. काही निविदा २५ टक्क्यांपर्यंत कमी दराने प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ५० कोटींतील सुमारे आठ ते १० कोटींचा निधी शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

अशी आहेत कामे

- शिष्टमंडळ प्रवास करणाऱ्या मार्गांवरील विविध कामे- ३० कोटी.

- रस्त्यांवरील भिंती, पूल, उड्डाणपुलांची रंगरंगोटी- ५ कोटी.

- उद्यानांचा विकास, दुभाजकांची वृक्षछाटणी, नवीन वृक्षलागवड- ५ कोटी.

- मुख्य रस्त्यांवर व्हर्टिकल गार्डन, हरितपट्टा व कारंजे बसवणे- ५ कोटी.

- हेरिटेज साइट्स, उड्डाणपूल, वाहतूक बेटे. प्रमुख इमारतींवर रोषणाई- ५ कोटी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in