Aurangabad : कराड, सावेंकडून पंतप्रधान अवास योजनेला गती देण्यासाठी फडणवीसांना साकडे

Devendra Fadanvis :औरंगाबाद शहरातील पंतप्रधान योजना गेल्या कित्येक वर्षापासून रखडली आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Meeting News, Aurangabad
Pradhan Mantri Awas Yojana Meeting News, AurangabadSarkarnama

Pradhan Mantri Awas Yojana News : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या Aurangabad औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली.

Pradhan Mantri Awas Yojana Meeting News, Aurangabad
Shivsena : खोक्यांची रक्कम वाढली ? गुवाहाटीत आमदारांना आणखी पाच कोटी ..

यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, (Municipal Corporation ) महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Aurangabad)

डॉ. कराड यांनी योजनेच्या सद्यस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात बॅकांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे आवाहनही करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

यावर फडणवीसांनी पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देतांना, योजना राबविताना तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईने विचार करावा, असे निर्देश संबंधितांना दिले. या योजनेच्या सद्य स्थितीसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले.

तसेच योजनेस गती देण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक असणा-या मुद्द्यांवरही चर्चा झाली. औरंगाबाद शहरातील पंतप्रधान योजना गेल्या कित्येक वर्षापासून रखडली आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे पात्र लाभधारक घरापासून वंचित राहिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com