Aurangabad : निवेदन देण्यास परवानगी नाकारल्याने जाधव भडकले, म्हणाले मी पापी आहे का ?

दानवे हे केंद्रातील मंत्री आहेत, त्यांनी रेल्वेची मागणी पुर्ण करण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली पाहिजे. सिमेंट रस्त्याचे, मंगल कार्यालयाचे उद्घाटन हे कार्यक्रम जिल्हा परिषदेचे सदस्य करत असतात. (Harshvardhan Jadhav)
Harshvardhan Jadhav-Raosaheb Danve News, Aurangabad
Harshvardhan Jadhav-Raosaheb Danve News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री Raosaheb Danve रावसाहेब दानवे यांनी कन्नडला रेल्वे सुरू केली तर मी तुमच्या समोर लोटांगण घालीन, असे आव्हान दिले होते. तसेच रेल्वे संदर्भात निवदेन देण्यासाठी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवगांव रंगारी येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रावसाहेब दानवे आज कन्नड तालुक्यात होते. परंतु दानवे यांना निवेदन देण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन जाधव Harshvardhan Jadhav यांना परवानगी नाकारली.

Harshvardhan Jadhav-Raosaheb Danve News, Aurangabad
MNS : वय झालेले राज्यपाल महाराष्ट्राला नको, त्यांना परत दिल्लीला बोलवा..

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, असे कारण देत ही परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर हर्षवर्धन जाधव चांगलेच भडकले. रेल्वे मंत्र्यांना रेल्वेच्या प्रश्नावर निवदेन द्यायचे म्हणून भेट मागितली होती. (Kannad) हजारो लोक त्यांना भेटणार आहेत, पण मग मलाच परवानगी का नाकारण्यात आली? हर्षवर्धन जाधव कोण आहे? मी पापी आहे का? (Harshvardhan Jadhav) असा सवाल जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितीत केला आहे. तसेच भाजपला हासडून काढा, असे आवाहन देखील त्यांनी कन्नडच्या नागरिकांना केले आहे.

तुम्हाला कन्नड मतदारसंघ जिंकायचा आहे, पण ते वाद आणि अंहकाराने जिकंता येणार नाही. त्यासाठी विकास करावा लागेल. या मतदारसंघाची गेल्या तीस वर्षापासूनची रेल्वेची मागणी आहे. औरंगाबाद-कन्नड-चाळीसगांव-धुळे रेल्वे सुरू करा. ज्या दिवशी या रेल्वेला तुम्ही प्रत्यक्षात हिरवा झेंडा दाखवाल, त्या दिवशी हे कन्नड तुमचं, मी पण तुमचा. तुमची इच्छा आहे ना, मी नाक घासत यावं, लोटांगण घालत यावं, तर मी तेही करायला तयार आहे. पण आधी कन्नड रेल्वे सुरू करा, असे आव्हान जाधव यांनी रावसाहेब दानवे यांना दिले होते.

तसेच रेल्वे सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन प्रत्यक्ष दानवे यांना भेटून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी रीतसर परवानगी देवगाव रंगारी पोलिसांकडे जाधव यांनी मागितली होती. परंतु कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी जाधव यांना भेट नाकारली. त्यानंतर संतप्त झालेल्या जाधव यांनी पुन्हा व्हिडिओ व्हायरल करत दानवे आणि भाजपवर आगपाखड केली.

दानवे हे केंद्रातील मंत्री आहेत, त्यांनी रेल्वेची मागणी पुर्ण करण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली पाहिजे. सिमेंट रस्त्याचे, मंगल कार्यालयाचे उद्घाटन हे कार्यक्रम जिल्हा परिषदेचे सदस्य करत असतात, ते रेल्वे मंत्र्यांचे काम नाही, असा टोला देखील जाधव यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com