Aurangabad : म्हणे पुरुषांवरील अत्याचारात वाढ, आयोग स्थापन करा नाहीतर कर्नाटकात जावू..

Aurangabad : महिलांप्रमाणेच पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा दावा या संघटनेने केला आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSarkarnama

Aurangabad News : राज्यातील सीमावर्ती भागातील गावे आम्हाला सुविधा मिळत नाही म्हणून शेजारच्या राज्यात जाण्याची भाषा करत आहे. Aurangabad कर्नाटक-महाराष्ट्रात याच मुद्यावरून वातवरण तापलेले आहे. असे असतांना एका वेगळ्या मागणीसाठी कर्नाटक राज्यात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Aurangabad News
Aurangabad Municipal Corporation: निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरे गटाला महागात पडणार ?

पत्नी पिडित संघटनेचे सदस्य असलेल्या पुरूषांनी ही मागणी केली आहे. तसेच महिलांकडून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचारावर दाद मागण्यासाठी पुरूष आयोग स्थापन करा, अन्यथा कर्नाटकात जाऊ, असा इशारा देखील या संघटनेने दिला आहे. (Aurangabad) शहरातील पत्नी पिडित संघटनेतील पुरूष सदस्यांनी ही आगळी वेगळी मागणी केली आहे. (Marathwada)

महिलांप्रमाणेच पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा दावा या संघटनेने केला आहे. महिलांवर अत्याचार झाले तर त्यांना दाद मागण्यासाठी महिला आयोग आहे, पण पुरूषांनी आपल्या अत्याचाराची दाद कोणाकडे मागावी? समाजाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे सात वर्षात तब्बल १० हजाराहून अधिक नव्या पत्नी पिडीत पुरूषांची संघटनेत भर पडली आहे.

पुरुषांवर होणारे अत्याचार, अन्याय याला आळा बसवा यासाठी पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी आम्ही वारंवार करत आहोत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता एक महिन्याच्या आत पुरुष आयोग स्थापन केला नाही तर आम्ही कर्नाटक राज्यात जाण्याचा निर्णय घेवू, असा इशारा देखील पत्नी पिडित संघटनेने दिला आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे यांनी पत्नी पीडित पुरुषांसाठी ही संघटना स्थापन केली आहे. पत्नीकडून होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ही संघटना दरवर्षी वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाला १०८ प्रदक्षिणा घालून निषेध व्यक्त करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com