Aurangabad : इम्तियाज जलील यांनी रिक्षा चालवण्याची हौस भागवली..

जंगल सफारीत थेट वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन त्यांना गोंजारणे असो की आता रिक्षा चालवणे असो, त्यांच्या या आगळ्या वेगळ्या रुपाची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये झाली नाहीतर नवलच. (Mp Imtiaz Jalil)
Mp Imtiaz Jalil News Aurangabad
Mp Imtiaz Jalil News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राजकारण सध्या चहावाला, पान टपरीवाला, रिक्षावाला यांना भलतीच क्रेझ आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणी रेल्वेस्टेशनवर चहा विकला होता असे बोलले जाते, तेव्हापासून चायवाला भी देश का पंतप्रधान बन सकता है, असे अभिमानाने सांगितले जाते. (Aimim) इकडे महाराष्ट्रात सत्तातंर होऊन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे देखील कधीकाळी रिक्षा चालवायचे. तर त्यांच्याच मंत्रीमंडळातील अनेक त्यांचे सहकारी मंत्री हे देखील कुणी पानटपरीचालक तर कुणी सुरुवातीच्या काळात रिक्षाचालक होते.

राजकारणातील ही क्रेझ पाहता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Mp Imtiaz Jalil) यांना देखील रिक्षा चालवण्याचा मोह आवरता आला नाही. (Aurangabad) आपल्या घरासमोर एका कार्यकर्त्यांची रिक्षापाहून त्यांनी थेट किक मारली आणि एक फेरफटका मारत रिक्षा चालवण्याची हौस भागवून घेतली. रिक्षा चालवतांनाचा इम्तियाज जलील यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

राजकारणात येऊन आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री झालेल्या अनेकांना भुतकाळात डोकावतांना आपण आधी काय होतो? हे आठवण्याची आवड असते. राजकारणातील आपला प्रवसा सांगतांना ते नेहमीच आपल्या भूतकाळातील गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतात. पंतप्रधान चायवाला, राज्याचा मुख्यमंत्री रिक्षावाला, कॅबिनेट मंत्री पानटपरीवाला अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मुळचे पत्रकार, पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते उतरले आणि आमदार झाले. आमदारकीची पाच वर्ष पुर्ण होत नाही तोच, लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवत ते खासदारही झाले. दहा वर्षातील त्यांची ही राजकीय कारकीर्द एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावी अशीच राहीली आहे.

Mp Imtiaz Jalil News Aurangabad
आमचे घरभाडे काढता, तुम्हाला लाज वाटत नाही का ? शिक्षकाने बंब यांना विचारला जाब..

जनतेच्या प्रश्नांना हात घालत प्रसंगी आक्रमकपणे सरकारशी दोन हात करणारे इम्तियाज जलील हे खासदार म्हणून देखील आपली छाप पाडून आहेत. राजकारणातील चायवाला, रिक्षावाला, पानटपरीवाला या क्रेझचा परिणाम बहुदा त्यांच्यावर देखील झाला आहे. म्हणूनच की काय, आपल्या घरासमोर आलेल्या पदाधिकाऱ्यांची रिक्षा घेऊन त्यांनी थेट फेरफटका मारला. जंगल सफारीत थेट वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन त्यांना गोंजारणे असो की आता रिक्षा चालवणे असो, त्यांच्या या आगळ्या वेगळ्या रुपाची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये झाली नाहीतर नवलच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in