Aurangabad : मृत मजुरांच्या कुटुंबियांना तातडीने मुख्यमंत्र्यांकडून ५० हजारांची मदत..

शिंदे यांनी तातडीने मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येक ५० हजारांची मदत बोरनारे यांच्या मार्फत पोहचवली. (Eknath Shinde)
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSarkarnama

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या नावडी गावात विजेचे जोडकाम करताना अचानक घडलेल्या दुर्घटनेत ४ कंत्राटी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना समजताच या घटनेची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

घटनेची माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. (Aurangabad) त्यानंतर त्यांनी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना फोन करून त्यांना या कंत्राटी मजुरांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

तसे झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना मदत देण्याची तयारीही शिंदे यांनी दर्शवली आहे. कन्नड तालुक्यातील नावडी येथे विजेच्या जोडणीचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या झटक्याने या मजुरांचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. जगदीश मुरकुंडे, भारत वरकड,अर्जुन मगर,गणेश थेटे अशी या मजुरांची नावे आहेत.

Cm Eknath Shinde
Shivsena : मुस्लिम मतं काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नये, म्हणून एमआयएमचा मोर्चा..

आमदार बोरनारे यांनी मंजुरांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येक ५० हजारांची मदत बोरनारे यांच्या मार्फत पोहचवली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव येताच प्रत्येक मजुराच्या कुटुंबियांना प्रत्येक पाच लाखांची मदत देण्यात येईल, असेही सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in