Aurangabad : प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचे नियम पाळा, परवानगी घ्या...

समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट टाकणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही अशा चिथावणीखोरांची माहिती पोलिसांना माहिती द्यावी. ( Police Commissioner Nikhil Gupta)
Aurangabad : प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचे  नियम पाळा, परवानगी घ्या...
Police Commissioner Nikhil Gupta, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाबद्दल आक्षेप घेत या विरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला. (Aurangabad) राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम देत कारवाईची मागणी केली, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा देखील दिला होता.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर संदर्भात काही नियमावली तयार केली. त्याची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक शहरातील पोलिस आयुक्तांवर (Marathwada) सोपवण्यात आली आहे.

राज ठाकरे यांची औरंगाबादेत १ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता (Police Commissioner Nikhil Gupta) यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले असून त्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

पोलिस आयुक्तांनी प्रार्थना स्थळांवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेत आणि नियमानूसार ठेवावा, लाऊडस्पीकरची परवानगी नसेल तर ती पोलिसांकडून घ्यावी, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Police Commissioner Nikhil Gupta, Aurangabad
Beed : गोळीबार प्रकरणात क्षीरसागर पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नियमांचे पालन न करणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या शिवाय सध्या सोशल मिडियावर काही चुकीच्या गोष्टी व्हायरल केल्याजा आहेत, यावर देखील आमचे बारकाईने लक्ष असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट टाकणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही अशा चिथावणीखोरांची माहिती पोलिसांना माहिती द्यावी, त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.