Aurangabad : खासदार फौजिया खान यांच्या घरातून तीन हजार रुपयांच्या पाच भांड्यांची चोरी..

आता खासदारांच्याच घरी चोरी झाली म्हटल्यावर पोलिसांकडून तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. (Crime News)
Mp fauzia khan, News Aurangabad
Mp fauzia khan, News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : दिवाळी अवध्या दोन दिवसांवर येवून ठेपलेली असतांना चोरट्यांचा सुळसुळाट देखील वाढला आहे. याचा फटका सामान्यांप्रमाणेच राजकारण्यांना देखील बसत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादेतील घरात देखील चोरी झाल्याचे समोर आले आहे.

Mp fauzia khan, News Aurangabad
Marathwada : हृदयविकाराचा धक्का शिरसाटांना, पण वेदना शिंदेंना..

एन-१३ चाऊस काॅलनीतील त्यांच्या बंगल्यातून तीन हजार रुपये किंमतीची पाच जर्मनची भांडी चोरीला गेल्याची तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. (Crime News) पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Fir Filed) आता खासदारांच्याच घरी चोरी झाली म्हटल्यावर पोलिसांकडून तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. (Aurangabad)

फौजिया खान यांचे औरंगाबादेतील एन-१३ भागातील चाऊस कॉलनीमध्ये घर आहे. या घरात नुकतीच चोरी झाली. चोरट्यांनी रात्री त्यांच्या घराच्या मागील कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. या प्रकरणी तहेसीन अहेमद खान यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराच्या पाठीमागील दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील जर्मनचे पाच जुने भांडे चोरून नेले आहेत. त्यांची किमंत ३ हजार रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १६ आॅक्टोबर रोजी चोरी झाल्याचे उघड झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावरच चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. खासदारांच्या घरी चोरी झाल्यामुळे पोलिसांसमोर हे मोठे आव्हान असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com