Aurangabad : तुपकरांसह शेतकरी मुंबईच्या दिशेने ; सिल्लोडजवळ शेतात खाल्ली दुपारची भाकर..

तुपकर आंदोलनावर ठाम असून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलनासाठी जिल्हाभरातून शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे चित्र आहे. (Ravikant Tupkari)
Farmers Way To Mumbai For Protest News, Aurangabad
Farmers Way To Mumbai For Protest News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत रविकांत तुपकर यांनी थेट मुंबई येथे अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनासाठी गावागावांतून शेतकरी मुंबईच्या दिशेने आज निघाले आहेत. सकाळी आठ वाजता तुपकरी शकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Farmers Way To Mumbai For Protest News, Aurangabad
Shivsena : चाळीस गावं काय ? ४० इंच जमीन देखील कर्नाटकला घेता येणार नाही..

उद्या २४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयाशेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरून अरबी समुद्रात हे आंदोलक जलसमाधी घेणार आहेत. (Affected Farmers) तुपकर आणि शेकडो शेतकऱ्यांचा ताफा दुपारी अडीच वाजता भोकरदन-सिल्लोड दरम्यान पोहचला. (Vidharbha) यावेळी दुपारचे जेवण करण्यासाठी एका मोकळ्या मैदानात तुपकर व आंदोलक बसले होते. सोबत आणलेल्या भाकरी-चटणी खाऊन हा आंदोलकांचा ताफा पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे दोन दिवसांपुर्वीच पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे. परंतु तुपकर आंदोलनावर ठाम असून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलनासाठी जिल्हाभरातून शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षीदेखील आंदोलन पेटले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शासनाने चर्चेला बोलावले होते. यावर्षी ६ नोव्हेंबरला प्रचंड मोठा एलगार मोर्चा निघाला तरी शासनाने अद्यापही कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही.

त्यामुळे आम्ही अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. तरीही सरकार सोयाबीन - कापूस उत्पादकांचा आवाज ऐकायला तयार नाही, सरकारला आमची प्रेतंच बघायची आहेत का? असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com