Aurangabad : निवडणूक कामात टाळाटाळ भोवली ; चार लिपिकांवर गुन्हा दाखल..

कामकाजाबाबत सूचना केल्या असतांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे चारही बीएलओ बैठकीस गैरहजर राहिले. शिवाय त्यांनी बीएलओचे काम सुरू केलेले नाही. (Aurangabad)
Fir Filed Against BLO In Aurangabad News
Fir Filed Against BLO In Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : मतदार यादी तयार करणे, अद्यावत करणे, आधार जोडणी करणे आदी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याने चार कनिष्ठ लिपिकांवर निवडणूक कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल (Fir Filed) करण्यात आला आहे. औरंगाबाद (Aurangabad) तहसीलदार कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे.

कडा परिसरातील पाटबंधारे विभागाच्या संशोधन विभागातील व्ही. व्ही. जाधव, पद्मपुऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागातील पी.बी.दुधे, सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिन रेवले आणि डी.एस.जारवाल या बीएलओंनी निवडणूक(Marathwada) कामात टाळाटाळ केल्याने लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वतंत्र बीएलओ नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीला आधार क्रमांक जोडण्याबाबत, १ जानेवारी २०२३ च्या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वतंत्र बीएलओ नेमण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जाधव, दुधे, रेवले व जारवाल यांचे नियुक्ती आदेश तहसील कार्यालयाने दिले होते. त्यांना नियुक्तीबाबत कल्पना देखील देण्यात आली होती. बैठकीत कामकाजाबाबत सूचना केल्या असतांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे चारही बीएलओ बैठकीस गैरहजर राहिले.

Fir Filed Against BLO In Aurangabad News
याकूबचा मृतदेह ताब्यात दिला तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, मग त्यांना जबाबदार धरायचे का ?

शिवाय त्यांनी बीएलओचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु तरी देखील त्यांनी कामकाज सुरू न केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे तहसील कार्यालयाने कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com