Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नका, अन्यथा रस्त्यावर उतरू..

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेने आधीच राज्यातील वातावरण बिघडले आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
Raj Thackeray-Amit Bhuigal
Raj Thackeray-Amit BhuigalSarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देऊ नका, यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, अशी भिती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) या सभेला विरोध दर्शवला आहे. सभेला परवानगी मिळाली तर आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, अशा इशारा देखील वंचितकडून देण्यात आला आहे.

एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेची मनसेकडून जय्यत तयारी सरू आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान बुक करण्यात आले आहे, तर पोलिसांच्या परवानगीसाठी आजच मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलिसा आयुक्त निखिल गुप्ता यांना भेटले. (Aurangabad)

पोलिसांनी अद्याप सभेला परवानगी दिली नसली तरी यावरून आता राजकीय वातावरण तापायला लागले आहे. मनसेचे शिष्टमंडळ सभेला परवानगी मिळावी म्हणून आयुक्तांना अर्ज देऊन येत नाही तोच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

राज ठाकरे यांच्या सभेला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी आपण आयुक्तांकडे केली असल्याचे वंचितचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले. भुईगळ म्हणाले, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेने आधीच राज्यातील वातावरण बिघडले आहे.

Raj Thackeray-Amit Bhuigal
Latur : कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून जनतेला वेठीस धरण्याचा सरकारचा कट

मुस्लिम बांधवाचा रमझान सुरू आहे, अशावेळी भोंग्यावरून वाद निर्माण केला जात आहे. शहरातील शांतता या सभेमुळे धोक्यात येऊ शकते. दोन जाती-धर्मांमध्ये तिढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या सभेतून होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून सभेला विरोध करू, असेही भूईगळ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com