Aurangabad : मंत्रीमंडळ बैठकीची चर्चा, पण मंत्रीच दुजोरा देईना..

औरंगाबादेत मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रीमंडळ बैठकीचे नियोजन आहे. (Minister Atul Save)
Ministry Meeting In Aurangabad News
Ministry Meeting In Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन आणि देशाचे अमृत महोत्सवीय वर्ष याचे औचित्य साधत औरंगाबाद (Aurangabad) येथे मंत्रीमंडळ बैठक घेण्याचे नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. (Atul Save) पण या संदर्भात मंत्र्यांकडूनच दुजारो मिळत नाहीये. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबादेत राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार असल्याची चर्चा आहे.

सहा वर्षांच्या खंडानंतर औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात १७ सप्टेंबरपासून होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या विकासकामांना चालना देतील, नवीन योजना जाहीर करतील, अशी माहितीही मिळाली आहे.

मराठवाड्याच्या विकासाचा अनुषेश भरून काढण्यासाठी मंत्रीमंडळाची एक बैठक औरंगाबादेत घ्यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर औरंगाबादेत बैठका घेण्यास सुरूवात झाली. पण त्यात सातत्य राहिले नाही. शेवटची मंत्रीमंडळ बैठक आॅक्टोबर २०१६ मध्ये झाली होती. आता पुन्हा औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठकीची चर्चा सुरू झाली आहे. परंतु अशी काही बैठक होणार असल्याची माहिती मंत्र्यांनाच नसल्याचे समोर आले आहे.

सहकारमंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता मंत्रीमंडळ बैठकी संदर्भात काहीच ठरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक झाली तर निश्चितच त्याचा फायदा मराठवाड्याला होऊ शकतो.

Ministry Meeting In Aurangabad News
Aurangabad : राजस्थानातील माध्यान्ह भोजन घोटाळ्याचे औरंगाबाद कनेक्शन ? चार ठिकाणी धाडी..

कृषी, सहकार आणि रोहयो अशी महत्वाची खाती जिल्ह्याला मिळाली आहेत. त्यामुळे औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठक झाली तर या तीन खात्यासह इतर विभागांचे प्रश्न तातडीने मार्गी लागू शकतात. १७ सप्टेंबर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

औरंगाबादेत मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रीमंडळ बैठकीचे नियोजन आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीच्य तयारीसाठी अवघा आठवडा शिलल्क असतांना मंत्र्यांनाच या संदर्भात माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com