Aurangabad : दानवेसाहेब हे करा.. हर्षवर्धन जाधव तुमच्यासमोर लोटांगण घालत येईल..

वाद, अंहकार बाजूला ठेवा, ज्या दिवशी प्रत्यक्षात तुम्ही कन्नड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवाल, त्या दिवशी हे कन्नड तुमचे, मी पण तुमचा. तुमच्या समोर नाक घासत, लोटांगण घालत येईल. (Harshvardhan Jadhav)
Harshvardhan Jadhav-Raosaheb Danve News, Aurangabad
Harshvardhan Jadhav-Raosaheb Danve News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून एक आव्हान दिले आहे. तुम्हाला कन्नड मतदारसंघ जिंकायचा आहे, पण ते वाद आणि अंहकाराने जिकंता येणार नाही. त्यासाठी विकास करावा लागेल.

Harshvardhan Jadhav-Raosaheb Danve News, Aurangabad
Aimim : डोक्यावर नोटांची उधळण सुरू होती, अन् इम्तियाज जलील टाळ्या वाजवत होते..

या मतदारसंघाची गेल्या तीस वर्षापासूनची रेल्वेची मागणी आहे. औरंगाबाद-कन्नड-चाळीसगांव-धुळे रेल्वे सुरू करा. (Harshvardhan Jadhav) ज्या दिवशी या रेल्वेला तुम्ही प्रत्यक्षात हिरवा झेंडा दाखवाल, त्या दिवशी हे कन्नड तुमचं, मी पण तुमचा. तुमची इच्छा आहे ना, मी नाक घासत यावं, लोटांगण घालत यावं, तर मी तेही करायला तयार आहे. पण आधी कन्नड रेल्वे सुरू करा, असे आव्हान जाधव यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना दिले आहे.

हर्षवर्धन जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहेत. आता त्यांना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चक्क केंद्रीय रेल्वे राज्यमत्री रावसाहेब दानवे यांनाच आव्हान दिले आहे. जाधव आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात, कन्नडमध्ये तुमचे मोठे पोस्टर लागले आहेत. देवगांव रंगारीला मोठा कार्यक्रम घेणार असल्याची ती पोस्टर आहेत. सिमेंट रस्ते, मंगल कार्यालय अशी कामे आमचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे करत असतात.

माझ्याशी तुमचे वैयक्तिक, कौटुंबिक काहीही वाद असू द्या, पण रायभान जाधव विकास आघाडी, म्हणजे विकास. आम्हाला विकास हवा आहे. तुम्ही केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहात, ज्या भागातला केंद्रात मंत्री असतो, त्या भागात तो सर्वाधिक विकास कामे करतो हा आतापर्यंतचा दिल्लीतील अनुभव आहे. आमचे अण्णा शिंदे गेल्या ३० वर्षापासून औरंगाबाद-कन्नड-चाळीसगांव-धुळे रेल्वे सुरू करा, अशी मागणी करतायेत. त्यांनी या संदर्भात पत्रव्यवहार देखील केला आहे.

माझी रेल्वे मंत्री म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्हाला कन्नड मतदारसंघ जिकायंचा आहे ना, तुम्हा हर्षवर्धन जाधव नाक घासत यावा, लोटांगण घेत यावा असे वाटते ना. मी त्याला तयार आहे, पण तुम्ही कन्नडची रेल्वे सुरू करून दाखवा. वाद, अंहकार बाजूला ठेवा, ज्या दिवशी प्रत्यक्षात तुम्ही कन्नड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवाल, त्या दिवशी हे कन्नड तुमचे, मी पण तुमचा. तुमच्या समोर नाक घासत, लोटांगण घालत येईल, पण त्याआधी कन्नड रेल्वे सुरू करा, असे आव्हान जाधव यांनी रावसाहेब दानवे यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com