
Marathwada : सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल झाला होता. (Police) पोलिसांनी आज त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मित्राच्या पत्नीचा गाडीत ढुमे यांनी छेड काढत, पुन्हा घरी जावून पती, दिराला मारहाण केल्याचा ढुमे यांच्यावर आरोप आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर काल सिटी चौक पोलिसांनी ढुमे यांच्यावर (Fir Filed) गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली. (Aurangabad) न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ढुमे यांच्याकडून जामिनीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जाते. छेड काढण्यात आलेली महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह शहरातील सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होते.
तिथे पतीच्या ओळखीचे विशाल ढुमे तिथे आले होते. विशाल ढुमे आणि तिच्या पतीची भेट झाली तेव्हा गाडी न आणल्याचा बहाणा करत ढुमे यांनी आपल्याला घरी सोडण्याची विनंती केली. सदर महिलेच्या पतीने होकार दिला, मात्र गाडीत बसताच पुढच्या सीटवर बसलेल्या पीडित महिलेची मागे बसलेल्या ढुमे यांनी छेड काढायला सुरवात केली.
भेदरलेली महिला घरी येताच गाडीतून उतरून घरात गेली. त्यानंतर आपल्या घरी न जाता ढुमे यांनी मला तुमच्या बेडरूममधील वॉशरुममध्ये जायचे असा आग्रह करत पीडित महिलेच्या घरासमोर गोंधळ घालत होते. अखेर पोलिसांना बोलावून ढुमे यांना तिथून नेण्यात आले होते. या गोधंळात ढुमे यांनी पिडित महिलेचा पती आणि दाराला मारहाण, शिवीगाळ केल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.