Aurangabad Crime News : एसीपी ढुमेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही, बडतर्फ करा..

Nilam Gorhe : महिलांशी अश्लील, असभ्यवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही
Nilam Gorhe- Acp Dhume News, Aurangabad
Nilam Gorhe- Acp Dhume News, AurangabadSarkarnama

Police : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर काल गृहविभागाने निलंबनाची कारवाई केली. औरंगाबादेत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ढुमे (Vishal Dhume) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दारू पिवून महिलेचा विनयभंग केल्यानंतर पिडितेच्या पती, दिराला घरात घुसून मारहाण, शिवीगाळ केल्याने ढुमे यांच्याविरोधात सामान्यांमध्ये संताप वाढला होता.

Nilam Gorhe- Acp Dhume News, Aurangabad
Chandrakant Khaire : मोदींची हवा आता संपली, भाजप मुंबई कधीच जिंकू शकत नाही..

महिला, राजकीय, सामाजिक संघटना देखील ढुमे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आग्रही होत्या. जनक्षोम आणि ढुमे यांनी केलेला गंभीर गुन्हा (Cime News) पाहता गृहविभागाने याची दखल घेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. (Aurangabad) परंतु या कारवाईने देखील सामान्याचे समाधान होत नाहीये.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ढुमे यांना आता तातडीने बडतर्फच करा, अशी मागणी केली आहे. गोऱ्हे यांनी या संदर्भात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी लिफ्ट मागत गाडीत बसलेल्या एका महिलेशी अश्लील चाळे केले. घरात घुसून पीडित महिलेच्या पती, सासूला शिवीगाळ केली आहे. यासंदर्भात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून अहमदनगर येथे देखील त्यांनी असेच प्रकार यापूर्वीदेखील केले आहेत.

त्यामुळे त्यांना निलंबित करून चलणार नसून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. अशा महिलांशी अश्लील, असभ्यवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com