Aurangabad Crime : एसीपी ढुमेंच्या विरोधात संताप, सीपी म्हणतात वाट बघावी लागेल..

Police News: ढुमे यांच्या निलंबनाची मागणी होत असतांना पोलिस आयुक्तांनी त्यांची सध्या फक्त बदली केली आहे.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime NewsSarkarnama

Marathwada : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी एका महिलेची छेड काढत तिचा विनयभंग केला. घरी जाऊन तिच्या पती, दिराला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी १४ तासांच्या तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Police) कायद्याचे रक्षकच महिलांच्या अंगावर हात टाकत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे? असा संतप्त सवाल विविध राजकीय, सामाजिक संघटना आणि महिलांना उपस्थीत केला आहे.

Aurangabad Crime News
30-30 Scam : शेतकऱ्यांना लुटणाऱ्या राठोडने भावाच्या साखरपुड्यात वाटल्या सोन्या-चांदीच्या भेटवस्तू..

विशेष म्हणजे न्यायालयाने ढुमेंना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि लगेच जामीनही मंजुर केला. (Police) याबद्दल देखील आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. ढुमे यांना तात्काळ निलंबित करा, या मागणीसाठी आता राजकीय पक्ष, नेते, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. (Aurangabad) तर दुसरीकडे पोलिसा आयुक्त निखील गुप्ता मात्र वरिष्ठ पातळीवरूनच कारवाई होईल, तोपर्यंत वाट बघावी लागेल असे सांगत आहेत.

महिलेचे कुटुंब भयभीत झाले असून त्यांच्यावर ढुमे विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी निनावी फोनवरुन दबाव आणला जात असल्याचे समजते. विशेष म्हणजे घटना घडली त्यादिवशी पिडित महिलेचे कुटुंब ढुमे यांना घरातून जाण्यासाठी विनवण्या करत असतांना ढुमे मात्र मी सीपीच्या जवळचा आहे, तुम्हाला फाडून टाकीन, अशी भाषा वापरत होते. पिडित महिलेचा पती हा ढुमे यांचा मित्र असल्याचे खोटे सांगितले जात असल्याचा आरोप देखील पिडित महिलेने केला आहे.

एकंदरित ढुमे यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून केला जातोय, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमांवरून केला जात आहे. ढुमे यांच्या निलंबनाची मागणी होत असतांना पोलिस आयुक्तांनी त्यांची सध्या फक्त बदली केली आहे. तीन दिवस उलटून गेले तरी ढुमेंवर निलंबनाची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

पोलिस आयुक्त गुप्ता यांनी ढुमे यांच्या गुन्ह्याचा तपास करून त्याचा सविस्तर अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठवला असल्याचे सांगत आहेत. ढुमे एसीपी रॅंकचे अधिकारी असल्याने कारवाईची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com