
औरंगाबाद : सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१९ मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातील माहितीच्या तफावती संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.(Aurangabad) याच प्रकरणात पुर्वी चौकशी करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी थातुरमातुर चौकशी करून (Abdul Sattar) सत्तार यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने नव्याने चौकशी करून ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलांची नावे आल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची संधी हुकते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. (Marathwada) मात्र हे सगळे आरोप सत्तार यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांचा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश झाला, त्यांना कृषी खात्याचे मंत्री करण्यात आले. परंतु आता पुन्हा चौकशीचा ससेमिरा मागे लागणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक आहर्तेबाबत तफावत असलेली माहिती निवडणूक विभागाकडे सादर केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी अहवाल ६० दिवसात सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सिल्लोड येथील महेश शंकरपेल्ली व आरटीआय कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ, भा.द. वी कलम १९९, २०० व इतर अंतर्गत केस दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुक शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक आहर्ते संदर्भात दिलेली माहिती चुकीची असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.
या प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते, या आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला आहे. परंतु या अहवालात अनेक त्रुटी असून यात आरोपींना अभय दिले आहे, असा आक्षेप याचिकाकर्त्यांनी नोंदवला होता. त्यानंतर सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुन्हा नव्याने या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.